कुकरमध्ये कोणताही पदार्थ ठेवला आणि शिट्टी झाली की या शिट्टीतून पाणी बाहेर येतं आणि मग कुकर खराब होतो. कुकरातील पाणी झाकणावर येतं, ते खाली कुकरवर ओघळतंसुद्धा. पण एका वाटीने तुम्हाला हे सगळं टाळता येईल. या जबरदस्त किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
advertisement
व्हिडीओ दाखवल्यानुसार कोणताही पदार्थ तुम्ही कुकरमध्ये ठेवलात. उदा. तुम्ही डाळ शिजायला टाकली की त्याच्या मधोमध एक रिकामी वाटी ठेवा. आता कुकरचं झाकण घ्या. शिट्टीच्या खालच्या बाजूला तेल टाका. आता झाकण कुकरला लावा.
तुम्ही पाहाल तर आधी जे पाणी शिट्टीतून बाहेर येत होतं, ते बिलकुल येत नाही आणि कुकर अस्वच्छ होत नाही. @MaaYehKaiseKarun युट्युब चॅनेलवर या जुगाडचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम काय आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Kitchen Jugaad Video : 1 रुपयात संपूर्ण किचन चकाचक, हा जुगाड एकदा पाहाच
तुम्ही कुकर अस्वच्छ होऊ नये म्हणून काय करता, ती ट्रिकही सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगून आमच्यासोबत आणि इतर सोशल मीडिया युझर्ससोबत शेअर करा.