माचिसच्या काडीचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाच नसेल. तुम्हाला करायचं काय आहे तर, एका वाटीत एक चमचाभर मीठ, त्याच प्रमाणात खायचा सोडा घ्यायचा आहे. यात अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या. लिंबू रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर असेल तर तेसुद्धा टाकू शकता. आता यात पाणी टाकून मिक्स करा. यात सोडा असल्याने फेस येईल. मिश्रण डबल होईल.
advertisement
Kitchen Jugaad Video : केचअपच्या रिकाम्या पाकिटाचे 3 फायदे, पाहाल तर कधीच फेकणार नाही
आता 7-8 माचिसच्या काड्या घ्या, जितकं पाणी जास्त तितक्या काडेपेटीच्या काड्या जास्त लागतील. काडेपेटीवर जो काळा भाग असतो तो काढून घ्या. तो चाकून खरवडून काढा किंवा त्यावर हलक्या हाताने ठेचलं तरी तो निघेल. ही पूड तुम्ही आधी तयार केलेल्या मिश्रणात टाकायची आहे. यात एक विशिष्ट केमिकल असतं ज्याचा परिणाम आपल्याला इथं दिसेल. दुसऱ्या कोणत्या केमिकलची गरज पडणार नाही. आता यात शॅम्पू टाका. त्याऐवजी तुम्ही साबणाचे तुकडे उरले असतील ते तेसुद्धा किसून टाकू शकता.
हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. भरपूर बनवून तुम्ही हे एका पाकिटातही ठेवू शकता. आता या मिश्रणाचा टॉयलेटमध्ये काय फायदा. तर टॉयलेट कितीही स्वच्छ केले तरी त्यातील काही डाग जात नाही किंवा त्याची दुर्गंधी जात नाही. टॉयलेट अस्वच्छच आहे असं वाटतं. ही समस्या या तुम्ही तयार केलेल्या लिक्विडमुळे सुटेल. हे लिक्विड टॉयलेटमध्ये ओता अर्धा तास तसंच ठेवा. यावेळी टॉयलेटचा दरवाजा बंद करा. अर्ध्या तासानंतर फक्त पाणी ओतून हे लिक्विड स्वच्छ करून घ्या.
Kitchen Jugaad Video : चपाती-भाकरी पटकन करून देणारा डबा
@Puneritadka युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हीही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.