Kitchen Jugaad Video : चपाती-भाकरी पटकन करून देणारा डबा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : चपाती-भाकरी करणं म्हणजे पिठाचा पसारा आणि हाच पसारा टाळण्याचा जबरदस्त असा किचन जुगाड एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मुंबई : चपाती, भाकरी करणं म्हणजे एक प्रकारचं कौशल्यच. तसं चपाती-भाकरी बरेच जण करतात. पण ती नीट सगळ्यांनाच येते असं नाही. मग अशा वेळी लोक आपल्या परीने चपाती-भाकरी करतात. म्हणजे चपाती-भाकरी बनवण्यासाठी खास ट्रिक वापरतात. आपण याला जुगाड म्हणून. अशाच एका किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
चपाती-भाकरी बनवताना तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एक म्हणजे पीठ पातळ होतं किंवा घट्ट होतं, चपातील लाटताना ती पोळपाटाला किंवा लाटणीला चिकटते, चपाती कडक होतात, करपतात असे एक ना दोन चपाती-भाकरी किंबहुना सुरुवातीला बनवताना अशा बऱ्याच समस्या येतात आणि चपाती नकोशी वाटते.
advertisement
बरं तुम्ही चपाती बनवायला शिकलात तरी आणखी एक समस्या कायम ती म्हणजे चपाती करताना होणारा पसारा. तवा, पोळपाट, लाटणं, परात किंवा ताट आणि पिठाचा डब्बा अशी भांडी असतातच. शिवाय पसरलेलं पीठ, ज्यामुळे किचन अधिकच अस्वच्छ वाटतं. हाताला पीठ माखलेलं असतं, अंगाला पीठ लागतं ते वेगळंच. काही लोक तर चपाती-भाकरी करताना पिठाने रंग खेळले की काय, असंच त्यांच्याकडे पाहून वाटतं. पण आता याच समस्येवर उपाय सापडला आहे.
advertisement
एका महिलेने चपाती-भाकरी करताना पीठ पसरू नये, यासाठी सॉलिड जुगाड दाखवला आहे. तिने युट्युब अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दाखवल्यानुसार एक छोटा डबा घ्यायचा आहे. एखादी टोकदार वस्तू गॅसवर गरम करून त्याने या डब्याच्या झाकणाला छोटे-छोटे छिद्र करून घ्यायचे आहेत. जसे स्प्रिंकल डब्याच्या झाकणांवर असतात. आता या डब्यात पीठ भरायचं आहे, जे आपण चपाती किंवा भाकरी करताना वापरतो.
advertisement
आता जेव्हा तुम्ही चपाती किंवा भाकरी लाटाल, थापाल तेव्हा जे पीठ लागतं ते या डब्यातून घ्यायचं आहे. एरवी तुम्ही परात किंवा ताटातच एका बाजूला पीठ घेत असाल किंवा एखाद्या डब्यात घेत असाल आणि त्यात पिठाचा गोळा बुडवत असाल किंवा त्यातील पीठ हाताने घेऊन पसरवत असाल. तरीपण पीठ उडतं ते उडतंच. पण या ट्रिकने मात्र अगदी छान पीठ घेता येतं आणि पीठ फार पसरत नाही. यामुळे चपाती असो वा भाकरी दोन्हीही झटपटसुद्धा होतात.
advertisement
@chulaanimul120 युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही आणखी यासाठी काय जुगाड करता तेसुद्धा सांगायला विसरू नका.
Location :
Delhi
First Published :
September 21, 2025 3:34 PM IST