Kitchen Jugaad Video : एका वाटीची कमाल, प्रेशर कुकर खराब होणारच नाही

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : कुकरमध्ये कोणताही पदार्थ ठेवला आणि शिट्टी झाली की या शिट्टीतून पाणी बाहेर येतं आणि मग कुकर खराब होतो. कुकरातील पाणी झाकणावर येतं, ते खाली कुकरवर ओघळतंसुद्धा. पण एका वाटीने तुम्हाला हे सगळं टाळता येईल.

News18
News18
मुंबई : प्रत्येकाच्या किचनमध्ये कुकर असतो. कुकर म्हणजे झटपट जेवण बनवण्याचा सोपा मार्ग, किती तरी पदार्थ कुकरमध्ये बनवले जातात, भात म्हणू नका, डाळ म्हणू नका, भाजी म्हणू नका, अगदी गाजर हलव्यासारखे गोड पदार्थही कुकरमध्ये झटपट होतात. पण हाच कुकर खराबही होतो आणि तो स्वच्छ करणं म्हणजे कंटाळवाणं काम. पण एक वाटी ठेवली ही तुमचा प्रेशर कुकर खराब होणारच नाही.
कुकरमध्ये कोणताही पदार्थ ठेवला आणि शिट्टी झाली की या शिट्टीतून पाणी बाहेर येतं आणि मग कुकर खराब होतो. कुकरातील पाणी झाकणावर येतं, ते खाली कुकरवर ओघळतंसुद्धा. पण एका वाटीने तुम्हाला हे सगळं टाळता येईल. या जबरदस्त किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
advertisement
व्हिडीओ दाखवल्यानुसार कोणताही पदार्थ तुम्ही कुकरमध्ये ठेवलात. उदा. तुम्ही डाळ शिजायला टाकली की त्याच्या मधोमध एक रिकामी वाटी ठेवा. आता कुकरचं झाकण घ्या. शिट्टीच्या खालच्या बाजूला तेल टाका. आता झाकण कुकरला लावा.
advertisement
तुम्ही पाहाल तर आधी जे पाणी शिट्टीतून बाहेर येत होतं, ते बिलकुल येत नाही आणि कुकर अस्वच्छ होत नाही.  @MaaYehKaiseKarun युट्युब चॅनेलवर या जुगाडचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम काय आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
तुम्ही कुकर अस्वच्छ होऊ नये म्हणून काय करता, ती ट्रिकही सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगून आमच्यासोबत आणि इतर सोशल मीडिया युझर्ससोबत शेअर करा.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : एका वाटीची कमाल, प्रेशर कुकर खराब होणारच नाही
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement