तसं भांडी स्वच्छ करण्याचा घरगुती जुगाड म्हटलं की लोक बेकिंग सोडा, लिंबू, चिंच अशा गोष्टींचा वापर करतं. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मात्र साखरेने तवा स्वच्छ केला आहे. आता साखरेने तवा कसा काय स्वच्छ करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आता हे कसं शक्य आहे, नेमकं काय करायचं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
Kitchen Jugaad Video : माचिसच्या काडीचा असाही फायदा, टॉयलेटमध्ये टाकताच काय झालं पाहा
व्हिडीओत दाखवल्यानुसार, तवा गॅसवर ठेवून चांगला तापवून घ्या. भाकरीसाठी गरम करतो तितका तवा गरम करायला हवा. तव्यातून वाफा यायला लागतात म्हणजे तो चांगला गरम झाला आहे. आता एक चमचा साखर या तव्यावर पसरवा. संपूर्ण तवाभर ही साखर पसरायला हवी. गरम तव्यावर साखर टाकताच साखर त्यावर विरघळून जळू लागेल. गॅस फास्टच ठेवायचा धूर निघायला लागला की गॅस कमी करायचा बंद बिलकुल करायचा नाही.
साखर जळते आहे ती जळू द्यायची. यामुळेच तव्याचे जळल्याचे डाग निघतील. आता यावर थोडा खायचा सोडा भुरभुरा. आता फेस निघताना दिसेल. अर्धा लिंबू कापून घ्या त्याला चाकू लावून हा लिंबू तव्यावर फिरवून घ्यायचा आहे. काही वेळाने फेस येणं थांबेल. फेस येणं थांबल्याचं दिसेल आता गॅस बंद करायचा आहे. आता तवा थंड करून त्यात फक्त पाणी ओतून तो धुवून घ्यायचा.
आता पॉलिश पेपर घेऊन तव्यावर घासा. तुम्हाला याचं काळं पाणी निघताना दिसेल. तवा डायरेक्ट घासला तर हे निघणार नाही पण अशा पद्धतीने तव्याचं काळं लगेच निघेल. अशा पद्धतीने काळी झालेली इतर भांडीही तुम्ही स्वच्छ करू शकता. तारेच्या काथ्यानेही घासू शकता. नंतर हा तवा नीट धुवून घ्या. व्हिडीओच्या शेवटी महिलेने तवा कसा स्वच्छ झाला ते दाखवलं आहे.
Kitchen Jugaad Video : केचअपच्या रिकाम्या पाकिटाचे 3 फायदे, पाहाल तर कधीच फेकणार नाही
असा काळाकुट्ट तवा अर्धा तास घासल्यानंतर कुठे स्वच्छ होतो. पण या पद्धतीने हाच तवा फक्त 10 मिनिटांत स्वच्छ होईल, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. @savitafoodandart या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.