Kitchen Jugaad Video : माचिसच्या काडीचा असाही फायदा, टॉयलेटमध्ये टाकताच काय झालं पाहा

Last Updated:

Matchstick use in toilet cleaning : माचिसचा अनोखा असा वापर ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. किचनमध्ये माचिसची काडी टाकताच कमाल झाली. हा जबरदस्त असा किचन जुगाड ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : माचिसचा वापर आपण कशासाठी करतो तर आग पेटवण्यासाठी. म्हणजे गॅस, दिवा वगैर लावण्यासाठी आपण माचिस वापरतो. पण माचिसचा अनोखा असा वापर ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. किचनमध्ये माचिसची काडी टाकताच कमाल झाली. हा जबरदस्त असा किचन जुगाड ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
माचिसच्या काडीचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाच नसेल. तुम्हाला करायचं काय आहे तर, एका वाटीत एक चमचाभर मीठ, त्याच प्रमाणात खायचा सोडा घ्यायचा आहे. यात अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या. लिंबू रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर असेल तर तेसुद्धा टाकू शकता. आता यात पाणी टाकून मिक्स करा. यात सोडा असल्याने फेस येईल. मिश्रण डबल होईल.
advertisement
आता 7-8 माचिसच्या काड्या घ्या,  जितकं पाणी जास्त तितक्या काडेपेटीच्या काड्या जास्त लागतील. काडेपेटीवर जो काळा भाग असतो तो काढून घ्या. तो चाकून खरवडून काढा किंवा त्यावर हलक्या हाताने ठेचलं तरी तो निघेल. ही पूड तुम्ही आधी तयार केलेल्या मिश्रणात टाकायची आहे. यात एक विशिष्ट केमिकल असतं ज्याचा परिणाम आपल्याला इथं दिसेल. दुसऱ्या कोणत्या केमिकलची गरज पडणार नाही. आता यात शॅम्पू टाका. त्याऐवजी तुम्ही साबणाचे तुकडे उरले असतील ते तेसुद्धा किसून टाकू शकता.
advertisement
हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. भरपूर बनवून तुम्ही हे एका पाकिटातही ठेवू शकता. आता या मिश्रणाचा टॉयलेटमध्ये काय फायदा. तर टॉयलेट कितीही स्वच्छ केले तरी त्यातील काही डाग जात नाही किंवा त्याची दुर्गंधी जात नाही. टॉयलेट अस्वच्छच आहे असं वाटतं. ही समस्या या तुम्ही तयार केलेल्या लिक्विडमुळे सुटेल. हे लिक्विड टॉयलेटमध्ये ओता अर्धा तास तसंच ठेवा. यावेळी टॉयलेटचा दरवाजा बंद करा. अर्ध्या तासानंतर फक्त पाणी ओतून हे लिक्विड स्वच्छ करून घ्या.
advertisement
@Puneritadka युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हीही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : माचिसच्या काडीचा असाही फायदा, टॉयलेटमध्ये टाकताच काय झालं पाहा
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement