TRENDING:

Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये मीठ ठेवताच चमत्कार, हजारो रुपये वाचतील

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : फ्रिजमध्ये मिठाचा हा जबरदस्त असा किचन जुगाड, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : फ्रिजमध्ये आपण काय ठेवतो तर फळंभाज्या, पाणी आणि खराब होण्याची शक्यता असते असे पदार्थ. पण तुम्ही फ्रिजमध्ये मीठ ठेवून पाहिलं आहे का? फ्रिजमध्ये मीठ वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. फ्रिजमध्ये कुणी मीठ ठेवतं का, मीठ आपण बाहेर ठेवतो. असं तुम्ही म्हणाल. पण हा जबरदस्त जुगाड पाहाल तर तुम्हीही फ्रिजमध्ये मीठ ठेवाल.
News18
News18
advertisement

फ्रिजमध्ये मिठाचा हा जबरदस्त असा किचन जुगाड, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार तुम्हाला मीठ फ्रिजमध्ये ठेवायचं म्हणजे फ्रिजमध्ये थोडंसं टाकायचं आहे. आता याचा फायदा काय तर? सिंगल डोअर फ्रिजसाठी हे फायद्याचं आहे. सिंगल डोअर फ्रिज असेल तर फ्रिजरमध्ये सतत बर्फ बनत राहतो. बर्फाचा डोंगरच बनतो. अख्खा फ्रिजर बर्फाने भरतो. बर्फ बनवण्यासाठी किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी जागाच नसते.

advertisement

Kitchen Jugaad Video : फक्त एक चमचा साखर आणि काळाकुट्ट तवा 5 मिनिटात साफ

फ्रिजर स्वच्छ केल्यानंतर फ्रिजरमधील बर्फ पूर्ण काढल्यानंतर तिथं थोडंसं मीठ पसरवून टाका. यामुळे तिथं अतिरिक्त बर्फ तयार होणार नाही. Maa, yeh kaise karun? युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

advertisement

फ्रिजशी संबंधित असाच आणखी एक जुगाड. जो वाटीचा आहे. एका वाटीच्या तळाला तेल लावून ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवायची आहे. याचा फायदा काय, तर बऱ्याचदा फ्रिजरमध्ये बर्फ जमतो आणि तिथं असलेली भांडी या बर्फात चिकटून राहतात. जी सहजासहजी निघत नाहीत. बर्फ वितळेपर्यंत थांबावं लागतं. पण फ्रिजरमध्ये भांडं ठेवताना त्याच्या तळाशी असं कोणतंही तेल लावलं तर ते भांडं फ्रिजरला चिकटणार नाही. हवं तेव्हा ते सहज काढता येईल. या जुगाडाचा व्हिडीओ ab vlog युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video : माचिसच्या काडीचा असाही फायदा, टॉयलेटमध्ये टाकताच काय झालं पाहा

तेल-मिठाचा फ्रिजमधील हा जुगाड तुम्हीही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फ्रिजरमध्ये बर्फ जमा होऊ नये म्हणून तुम्ही काय जुगाड करता तेसुद्धा आमच्यासोबत आणि इतर वाचकांसोबत शेअर करायला विसरू नका.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये मीठ ठेवताच चमत्कार, हजारो रुपये वाचतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल