चहात साबण तुम्हाला वाचायलाच विचित्र वाटत असेल. साबण टाकून चहा बनवण्याचा हा जबरदस्त किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. याचा मोठा फायदा आहे असं हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या महिलेनं सांगितलं आहे. आता नेमकं काय ते जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये चहा 'ओतून' पाहा, चकीत करणारा परिणाम
advertisement
एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे, त्यात चहा पावडर टाकायचा आहे. आता यानंतर आपल्याला साखर, दूध, आलं किंवा वेलची यापैकी काही टाकायचं नाही. तर फक्त साबण किसणीवर किसून यात टाकायचा आहे. आता या चहाला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर हा चहा गाळून थंड करून घ्या. साहजिकच चहा असला तर साबण टाकला आहे त्यामुळे तो पिण्यासाठी नक्कीच नाही. मग याचा फायदा काय?
तर हे पाणी काचेच्या भांड्याना लावून घ्या. काचेची भांडी जुनी झाल्यानंतर त्यावरील चमक कमी होती, ते नव्यासारखे चमकत नाही तसंच त्यावर पाण्याचे डागही राहतात. मग ते अशा पद्धतीने चहा-साबणाच्या पाण्यात चोळून नंतर साध्या पाण्याने धुवून घेतल्याने नव्यासारखे चमकतील आणि त्यावर पाण्याचे डागही राहणार नाहीत.
Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठात नाणं टाकताच झाली कमाल, चुटकीत झालं मोठं काम
Avika rawat foods या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)