TRENDING:

टूथपेस्टच्या रिकामी ट्युबचे एक ना दोन तब्बल 6 फायदे; फेकण्याआधी हा जबरदस्त Kitchen Jugaad Video एकदा पाहाच

Last Updated:

टुथपेस्टच्या रिकाम्या ट्युबचा वापर कसा करायचा हे तुम्ही एकदा पाहाच.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : टूथपेस्ट संपत आली की ती पिळून पिळून त्यातील टूथपेस्ट पूर्णपणे वापरणारे बरेच लोक आहेत. काहीतर टूथपेस्टची ट्युब कापून, खोलूनही त्यातील टूथपेस्ट वापरतात. पण यानंतर मात्र टूथपेस्टची रिकामी ट्युब फेकून दिली जाते. तुम्हीही असंच करता तर थांबा. कारण टुथपेस्टच्या या रिकाम्या ट्युबचेही खूप फायदे आहेत. या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

टूथपेस्ट च्या रिकाम्या ट्यूब चा फायदा कसा. त्यापासून काय आणि कसं बनवायचा. त्याचा वापर कसा करायचा हे एका गृहिणीने दाखवलं आहे. एकेएक करत सर्व 8 फायदे किंवा वापर पाहूयात.

1) ट्यूबचा मागचा भाग कापून घ्या. आता इथून या ट्यूबमध्ये तुम्हाला हवं ते भरा. मागून ट्यूब थोडी फोल्ड करून त्यावर पेपर ठेवून इस्त्री फिरवून घ्या. म्हणजे ती पुन्हा बंद होईल.

advertisement

2) ट्यूबचा पुढचा भाग कापून घ्या. त्यानंतर वरील भाग थोडा गोलाकार कापा. संपूर्ण ट्यूबला एक कापड लावा. त्यावर डेकोरेशन करा. याचा वापर तुम्ही टेबल वर डिशच्या बाजूला चमचे ठेवण्यासाठी करू शकता.

3) ट्यूब दोन्ही बाजूंनी कापा. त्याचे दोन तुकडे करा. एक तुकडा घेऊन तो मधून आवळून घेऊन तिथे धागा बांधा. धागा बांधलेल्या ठिकाणी एखादा मोठा हिरा लावा. हा सुंदर बो तयार झाला. जो तुम्ही हेअरबँड, क्लिप शूजवर लावू शकता.

advertisement

Kitchen Jugaad Video - दागिन्यांइतकीच जपून ठेवा ज्वेलरी पर्स; तुम्हाला माहिती नसेल असा वापर

4) ट्यूबला वरून खालून दोन्ही बाजूंनी कापून नंतर त्याचे दोन भाग करा. एक भाग घेऊन तो फोल्ड करा. दुमडलेल्या भागाकडून कात्रीने थोडे थोडे कट द्या. स्ट्रिप गुंडाळून घ्या आणि शेवटच्या टोकाला चिकटवून घ्या. सुंदर फूल तयार.

advertisement

5) ट्यूबला वरून खालून दोन्ही बाजूंनी कापून नंतर त्याचे दोन भाग करा. छोट्या छोट्या पानांच्या आकारामध्ये कापून घ्या. एका पुठ्ठ्यावर पेपर लावून त्यावर ही पानं चिकटवून सुंदर डिझाईन तयार करा. पुठ्ठ्याला मागे दोरा लावा. वॉलपिस तयार.

6) ट्यूब स्ट्रिप कोनासारखी गुंडाळून घ्या. त्याचा टोकेरी भाग कापा. त्यावर लोकरी गुंडाळा. डायमंड चैन लावा. वरून इअरिंग हूक. सुंदर इअरिंग तयार.

advertisement

Jugaad Video - शेगडीवर ठेवा फक्त 2 प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही

युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
टूथपेस्टच्या रिकामी ट्युबचे एक ना दोन तब्बल 6 फायदे; फेकण्याआधी हा जबरदस्त Kitchen Jugaad Video एकदा पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल