TRENDING:

बापरे! तरुणाला कोब्रापेक्षाही खतरनाक साप चावला, 32 अँटीवेनम इंजेक्शन दिले, नंतर घडलं असं की...

Last Updated:

Snake Bite News : दंश केल्यानंतर साप लपून बसला पण लोकेशने त्याला पाहिलं. साप चावल्याचं समजताच लोकेशसह संपूर्ण कुटुंबाला घाम फुटला. त्यांनी ताबडतोब रुग्णालयाकडे धाव घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : सगळ्यात खतरनाक साप कोणता असं विचारलं की साहजिकच आपण कोब्रा असं सांगू. पण कोब्रापेक्षाही खतरनाक असा एक साप आहे, जो एका तरुणाला चावला. त्यानंतर त्याला 32 अँटिवेनम इंजेक्शन देण्यात आले. उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधील ही धक्कादायक घटना आहे.
News18
News18
advertisement

मालपुरा गावात राहणारा 27 वर्षांचा लोकेश सिंग बेडवर झोपला होता. त्याच्या हाताच्या अंगठ्याला क्रेट साप चावला. दंश केल्यानंतर साप लपून बसला पण लोकेशने त्याला पाहिलं. साप चावल्याचं समजताच लोकेशसह संपूर्ण कुटुंबाला घाम फुटला. त्यांनी ताबडतोब रुग्णालयाकडे धाव घेतली.

लोकेशला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं प्रथमोपचार देऊन त्याला एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. जिथं त्याला 32 अँटिवेनम इंजेक्शन देण्यात आले. तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला. वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला.

advertisement

बुटात लपून बसला होता 'मृत्यू', नवी मुंबईतील सुरक्षारक्षक थोडक्यात बचावला, काय घडलं Watch Video

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार सर्पमित्र भरत भास्कर म्हणाले की, सामान्य क्रेट साप हा कोब्रापेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन असतात, जे मज्जासंस्थेवर परिणाम करतात. वेळेवर उपचार न केल्यास, स्नायू कमकुवत झाल्यामुळे आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

advertisement

साप चावल्यास काय करू नये?

साप चावल्यावर लोक बऱ्याचदा अंधश्रद्धेला बळी पडून घरच्या घरी किंवा तांत्रिक, मांत्रिकाकडे जाऊन उपचार करतात. त्यात वेळ वाया जातो आणि व्यक्ती जीव गमावू शकते.

अनेकजण ज्या जागी सर्पदंश झाला आहे तो भाग कापडाने घट्ट बांधतात, जेणेकरून तिथून विष शरीरभर पसरू नये. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, उलट असं केल्याने रक्तप्रवाहात अडथळा येतो. ज्यामुळे शरिरात इतर समस्या होऊ शकतात.

advertisement

Snake Nagmani : सापाने शाळेत नागमणी सोडल्याची चर्चा, खरंच असा मणी असतो का?

सर्पदंश झालेल्या भागावर कधीच ब्लेडने किंवा चाकूने कापू नका. शिवाय विष चोखण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. तसंच तो भाग केवळ घरगुती उपचारांनी बरा करण्याचा प्रयत्न करू नये. रुग्णाला तातडीने रुग्णालयात घेऊन जा. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला गिळण्यास, बोलण्यास त्रास होत असेल, उलट्या होत असतील तर तिला काहीही खायला देऊ नये.

advertisement

साप चावल्यास काय करायचं?

एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास तो साप विषारी होता का, व्यक्तीला कितपत विषबाधा झाली आहे, हे ओळखणं जरा अवघड असलं तरी महत्त्वाचं असतं. त्यावरूनच योग्य ते उपचार करणं शक्य होतं. जर तुम्ही रागाच्या भरात सापाला मारलं असेल तर त्यालाही रुग्णालयात न्या. ज्यामुळे तो कोणत्या प्रजातीचा आहे हे कळल्यावर व्यक्तीवर योग्य ते उपचार करता येतील. परंतु लक्षात घ्या, साप कधीही काळजीपूर्वक हाताळा. कारण साप मरण्याचं नाटक करतात, जे तुमच्या जीवावर बेतू शकतं.

सर्पतज्ज्ञ सुभेंदू गंगोपाध्याय सांगतात की, ज्या जागी सर्पदंश झालाय तो भाग स्थिर ठेवावा. त्याची हालचाल पूर्णपणे थांबायला हवी. वेदनाग्रस्त भागाला जरा दाब देऊन मलमपट्टी करावी. जर पट्टी उपलब्ध नसेल तर टॉवेल वापरा. तो भाग हलक्या हाताने साबणाने धुवा आणि ओल्या कापडाने पुसून काढा. यावेळी रुग्णाला जागं ठेवा त्याला श्वास घेता येत नसेत तर तुम्ही तोंडाने हवा द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात घेऊन जा.

मराठी बातम्या/Viral/
बापरे! तरुणाला कोब्रापेक्षाही खतरनाक साप चावला, 32 अँटीवेनम इंजेक्शन दिले, नंतर घडलं असं की...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल