एक लहान मुलगी. व्हिडीओत पाहिल्यावर तिला अजून नीट बोलताही येत नसावं असं दिसतं पण तरी ती गाणं गायला शिकली आहे. तिचं गाणं ऐकून अनेक जण तिचे फॅन झाले आहेत. किती गोड, सो क्युट, सर्वात सुंदर गाणं अशा कमेंट युझर्सनी यावर केल्या आहेत.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता चिमुकली खाली बसली आहे. तिच्यासमोर एक व्यक्ती आहे जिने माइक हातात धरला आहे. चिमुकली माईकमध्ये गाताना दिसते आहे. आआ...आआ... असे सूर तिने ओढले आहेत. अगदी मन लावून ती गाते आहे. तिला गाताना पाहून तिच्या जवळचे लोकही कुतूहलाने हसत आहेत. तेव्हा चिमुकली गायची थांबते आणि हात वर करून त्यांना थांबायला सांगते.
आपल्याला गाण्यात अडथळा येत आहे, तुम्ही बोलू नका, हसू नका, शांत राहा असं ती हातांनीच खुनावून सांगते आहे. तिची ही क्रिया पाहून सगळ्यांना हसू येतं आणि सगळ्यांना हसताना पाहून चिमुकलीही लाजत खुदकन असते.
प्रेग्नंट होताच खूश झाली महिला, फुग्यासारखं फुगू लागलं पोट, सोनोग्राफी करताच डॉक्टर धक्क्यात
@ladu_1996 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. भविष्यातील लता मंगेशकर असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. मी आजवर पाहिलेला जगातील सगळ्यात सुंदर व्हिडीओ आणि गाणं अशी कमेंट एका युझरने केली आहे.
तुम्हाला ही चिमुकली गायिका, तिचं गाणं कसं वाटलं? या व्हिडीओवरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या.