माझ्या मम्मीपप्पाले फोन लावून द्या बरं! चिमुकल्याने नंबरही सांगितला, पण लावायचा कसा, लोकांना पडला प्रश्न, VIDEO VIRAL

Last Updated:

School Child Video Viral : बोबड्या बोलात आईवडिलांना फोन लावायची विनंती करणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : लहान मुलं शाळेत गेली की रडतात, आईवडीलांकडे जाण्याचा हट्ट करतात. असाच शाळेतील एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा चिमुकला त्याच्या आईवडिलांना फोन लावायला सांगतो आहे. आपल्या पालकांचा फोन नंबरही तो सांगतो आहे. पण मुलाच्या बोबड्या बोलातील नंबर ऐकल्यानंतर फोन लावायचा कसा आणि कुणाला असा प्रश्न पडतो हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
शाळेतील चिमुकल्याच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता एक चिमुकला शाळेत आहे. मुलगा वर्गातून बाहेर येतो आणि फोन नंबर सांगताना दिसतो. त्याच्यासमोरून एका पुरुषाचा आवाज येतो. कदाचित तो शिक्षक असावा.  जो हिंदीत विचारतो की मम्मी को फोन लगाना है या पापा को... मुलगा मराठीत बोलत असतो आणि पुरुष हिंदीत.
advertisement
शेवटी मुलाला समोर एक महिला दिसते. कदाचित ती त्याची शिक्षिका असेल. तो तिला हाक मारतो आणि म्हणतो माझ्या मम्मीपप्पाले फोन लावून द्या बरं... मुलाच्या बोलण्यावरून तो विदर्भातील असावा असं वाटतं. समोरून महिला त्याला फोन लावून द्यायला नकार देते. तेव्हा मुलगा चेहरा रडवेला करतो आणि लावून द्या अशी विनंती करतो. तेव्हा ती महिला त्याला पप्पांचा फोन नंबर माहिती आहे का? असं विचारते. मुलगा लगेच बोबड्या भाषेत मराठीत नंबर सांगतो. अगदी न अडखळता. शहाण्णव नून्नू चार एक्याण्णव नव्वद सत्तर... सुरुवातीच्या दोन नंबरनंतर पुढचा नंबर काय तो काही समजत नाही.
advertisement
advertisement
व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. अनेकांना व्हिडीओ आवडला आहे. बहुतेकांनी मुलाच्या मराठीवरील प्रेमाचं आणि त्याला मराठी शिकवणाऱ्या आईवडिलांचं कौतुक केलं आहे. तसंच काहींनी आपल्याला काही समजलं नाही पण आवडलं आहे, असं म्हटलं आहे.
अनेकांना मुलाने सांगितलेले मधले नंबर काही समजले नाही आहेत. तुम्हाला ते समजले का आणि हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
माझ्या मम्मीपप्पाले फोन लावून द्या बरं! चिमुकल्याने नंबरही सांगितला, पण लावायचा कसा, लोकांना पडला प्रश्न, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement