लहान मुलं आणि गणपत्ती बाप्पाचं तर एक वेगळंच कनेक्शन. गणपती बाप्पा लहान मुलांचा लाडका. मग बाप्पा कुठेही दिसो मुलांचे हात आपसूकच जोडले जातात. आता याच व्हिडीओत पाहा. एक मुलगी आपल्या वडिलांसोबत रस्त्याने जात होती. समोरून एक भलामोठा हत्ती आला. चिमुकली त्याच्याजवळ गेली आणि हात जोडून त्याला नमस्कार केला. तेव्हा हत्तीही तिच्याजवळ आला.
advertisement
साप आणि मुंगूसाची लढाई, मधे पडला कावळा; पुढे काय घडलं? तुम्हीच VIDEO मध्ये पाहा
आता इतका मोठा अवाढव्य हत्ती, पाहून मोठ्यांनाही भीती वाटेल. ही तर चिमुकली सुरुवातीला ती थोडी घाबरली. तिने महावताकडे पैसे दिले. तसा हत्ती तिच्या जवळ आला तेव्हा तिला भीती वाटली. हत्तीने सोंड उचलली, पण जशी चिमुकली घाबरली तशी त्यानेही आपली सोंड मागे केली. पण चिमुकली तिथून पळून वगैरे गेली नाही. तिने हिंमत करत हत्तीसमोर हात जोडून मान झुकवत नमस्कार केला. तेव्हा हत्तीने आपली सोंड उचलून तिच्या डोक्यावर ठेवत तिला आशीर्वाद दिला.
@comedyculture.in इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
गणपतीला कसं मिळालं हत्तीचं रूप?
गणेशाच्या जन्माची कथा तर तुम्हाला माहितीच आहे. शिवपुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या अंगावरील मळाचा एक पुतळा तयार केला होता. त्यांनी नंतर पुतळ्यात प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने गणेशाला घराच्या दारातून कोणालाही आत येऊ देऊ नये, अशी आज्ञा केली. गणेशजी दारात उभे असतानाच शिवाचं आगमन झालं. गणेशाने शंकराला आत जाण्यापासून रोखले. यावर शिवाने क्रोधित होऊन गणेशाचे डोके धडा वेगळं केलं.
माणसासारखा बोलणारा पोपट आता मोबाईलही वापरू लागला, चोचीने कसा चालवतो फोन पाहा VIDEO
पार्वती बाहेर आली तेव्हा गणेशाला मृत पाहून आक्रोश करू लागली आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. तेव्हा शिवाने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितलं की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, त्या बाळाचं डोकं आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचं डोकं आणलं. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडलं. त्यात त्यांनी प्राण आणलं. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचं शीर मिळालं.