रिटायर्ड फौजी हातात झेंडा घेऊन स्टेजवर परफॉर्म करत होता. अचानक त्याला स्टेजवरट हार्ट अटॅक आला आणि त्याचा जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे त्याला अचॅक आला तेव्हा तो खाली कोसळला मात्र लोकांना वाटलं की हा डान्सचाच भाग आहे. ही घटना सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Are You Human? गुगलवर असं का विचारलं जात, 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं उत्तर
advertisement
इंदौरमध्ये रिटायर्ड फौजी बलविंदर सिंह छाबडा स्टेजवर परफॉर्म करत होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भरपूर लोक बसलेले आहेत आणि बलविंदर स्टेजवर झेंडा हातात घेऊन डान्स करत आहे. अचानक त्यांना हार्ट अटॅक येतो आणि ते खाली कोसळतात. मात्र लोकांना तो डान्सचाच भाग असल्याचं वाटतं. मात्र बराच वेळ ते उठत नाही हे पाहून लोक त्यांना चेक करतात, सीपीआर द्यायला सुरुवात करतता. ते उठत नाही मग त्यांना हॉस्पिटला घेऊन जातात. तिथे डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात.
दरम्यान, इंदौरमधील या मन हेलवणाऱ्या घटनेनं लोक सुन्न झाले. @huzaifakhan1997 नावाच्या X अकाऊंटवर हा 55 सेकंदांचा धक्कादायक व्हिडीओ शेअर केलाय. यावर अनेक कमेंटचा भडीमार पहायला मिळत आहे.
