धार जिल्ह्यातील रुखसर, 27 नोव्हेंबर रोजी तिचा निकाह होता. पण तिचं खंडवा येथील उन्हेल तेथील विशाल राजपूतवर प्रेम होतं. त्यासाठी तिने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्यासाठी तिने सनातन धर्म स्वीकारला. सर्व विधींसह त्यांनी मंदिरात लग्न केलं. खांडवा येथील महादेवगड मंदिर संकुलात त्यांचं लग्न झालं. जोडप्याने वैदिक मंत्रांचा जप करत पवित्र अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घातल्या आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची प्रतिज्ञा केली. स्थानिकांनी रुखसारचं कन्यादान केलं आणि विशालने वंशिकाला मंगळसूत्र घालून तिला पत्नी म्हणून स्वीकारले. लग्नानंतर रुखसरला वंशिका हे नाव देण्यात आलं.
advertisement
वंशिकाने म्हणाली, "माझं नाव रुखसार आहे. मी विशालला इन्स्टाग्रामवर भेटले. आम्ही मित्र झालो आणि नंतर प्रेमात पडतो. मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण मला त्याचा धर्म आवडला. माझं लग्न 27 तारखेला होणार होतं. पण मी माझ्या स्वेच्छेने सनातन धर्मात प्रवेश केला आणि विशालशी लग्न केलं. मला लहानपणापासूनच सनातन धर्मात रस होता. मला माझ्या स्वतःच्या धर्मात राहायचं नव्हतं. म्हणूनच मी घरी बिंदी आणि साडी घालत असे. नवरात्रीत माताजी मंदिरालाही भेट दिली"
"या धर्मात देण्यासारखं खूप काही आहे. मला हा धर्म आवडला, म्हणून मी त्यात लग्न केलं, मी हा धर्म स्वीकारला. मला नेहमीच सनातन धर्माचं कौतुक वाटतं, कारण तो मुलींचा आदर करतो. मुलींना इथं ओळखलं जातं, त्यांना देवी मानलं जातं. या धर्माचे आणि जातीचे लोक महिलांचा आदर करतात, त्यांना देवी मानलं जातं. म्हणूनच मी भीती किंवा दबावाशिवाय सनातन धर्म स्वीकारला. आता मी माझ्या पतीसोबत राहीन. तो माझ्यासाठी योग्य आहे आणि माझ्या मृत्यूपर्यंत मला पूर्णपणे पाठिंबा देईल. त्याच्या कुटुंबाला माझ्यामुळे कोणतीही समस्या नाही.", असं ती म्हणाली.
अजब प्रकरण! कर्मचाऱ्याचा फोन पाहून भडकला बॉस, कामावरूनच काढून टाकलं
मीडिया रिरपोर्टनुसार वंशिकाशी लग्न करणारा विशाल राजपूत हा शेतकरी कुटुंबातून येतो आणि तो स्वतः शेतकरी आहे. तो लग्नामुळे खूप आनंदी आहे आणि त्याने रुखसारची नेहमीच काळजी घेण्याचं वचन दिलं आहे.
