लग्नाआधी आनंदी होता की लग्नानंतर आनंदी आहात, हाच प्रश्न विचारत एक तरुण माइक घेऊन रस्त्यावर उतरतो. रस्त्याने चालता चालता अनेकांना तो हा प्रश्न विचारतो. या प्रश्नावर जवळपास सगळ्या पुरुषांनी सारखं उत्तर दिलं आहे. महिलांची उत्तरं मात्र वेगवेगळी आहेत. महिलांची उत्तर ऐकून सगळे शॉक झाले आहेत.
नवरा-नवरीने रेकॉर्ड केला हनीमून नाइटचा Romantic Video, सकाळी झाला VIRAL, आवडीने पाहतायेत लोक
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहाल सगळ्यात आधी तो तरुण एका आजोबाकडे जाऊन त्यांना हा प्रश्न विचारतो. त्यानंतर काका आणि एका तरुणाला हा प्रश्न विचारतो. अशाप्रकारे तो सर्व पुरुषांना प्रश्न विचारतो, प्रत्येकाचं उत्तर एकच असतं की ते लग्नापूर्वी आनंदी होते आणि आता त्यांच्यावर जबाबदाऱ्या आल्या आहेत.
एक काका तर म्हणतात की त्यांना 8 मुलं आहेत पण त्यांना कोणी पैसे देत नाही आणि आता ते स्वतः रिक्षा चालवतात. टेम्पो ड्रायव्हरही तेच उत्तर देतो आणि यासोबत 1 मिनिटं 25 सेकंदाची रील संपते.
आता हा तरुण हाच प्रश्न घेऊन महिलांकडे वळतो. जेव्हा हा प्रश्न तो महिलांना विचारतो तेव्हा सुरुवातीला दोन महिला म्हणतात, त्या लग्नाआधी आनंदी होतात. त्यानंतर बहुतेक महिला लग्नानंतर आनंदी असल्याचं सांगतात. एक महिला मात्र आपण लग्नाआधीही आनंदी नव्हतो आणि लग्नानंतरही आनंदी नाही असं म्हणते.
महिलांना विचारता विचारता तो एका भाजीवालीजवळ पोहोचतो. प्रश्न ऐकताच ती त्याला तिथून पळवून लावते.
ऐकावं ते नवल! गरीब होताच जातो टॉयलेटमध्ये, बाहेर येताच होतो करोडपती, कसं काय?
हे दोन्ही रील @nirajyadav0.21 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.या प्रश्नाचं उत्तर रीलवरच संपत नाही. तर कमेंटमध्येही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.