ऐकावं ते नवल! गरीब होताच जातो टॉयलेटमध्ये, बाहेर येताच होतो करोडपती, कसं काय?

Last Updated:

Man earn money by potty : एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने दावा केला आहे की, "मी बाथरूममध्ये जातो, बाऊलमध्ये पैशांच्या नोटा छापतो आणि बाहेर पडताच करोडपती होतो" आता तो नेमकं असं काय करतो हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपण श्रीमंत व्हावं असं कुणाला वाटत नाही. पैसे कमवण्यासाठी काही लोक खूप मेहनत करतात तर काही झटपट मार्गाने पैसे कमवायला बघतात. झटपट पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत. पण तुम्ही कुणी कधी बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जाऊन पैसे कमवून करोडपती झाल्याचं ऐकलं तरी होतं का? अशीच एक व्यक्ती चर्चेत आी आहे. जी बाथरूममध्ये जाते आणि बाहेर येताच करोडपती बनते.
एका व्यक्तीने सोशल मीडियावर पैशांच्या कमाईचा सांगितलेला हा मार्ग पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने दावा केला आहे की, "मी बाथरूममध्ये जातो, बाऊलमध्ये पैशांच्या नोटा छापतो आणि बाहेर पडताच करोडपती होतो" आता तो नेमकं असं काय करतो हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर तो त्याची पॉटी विकतो.
advertisement
या व्हिडिओमध्ये तो माणूस गेल्या सहा महिन्यांपासून मल दान करत असल्याचा दावा करतो आणि त्यामुळे त्याचं जीवन बदललं आहे.जसं काही लोक स्पर्म किंवा ब्लड डोनेशनमधून पैसे कमवतात, तसं तो पॉटी विकून पैसे कमवतो.त्याने सांगितलं की तो दररोज सकाळी एका खास बाऊलमध्ये त्याची पूप जमा करतो आणि ते विकतो.  या व्हिडिओमध्ये तो माणूस गेल्या सहा महिन्यांपासून मल दान करत असल्याचा दावा करतो आणि त्यामुळे त्याचं जीवन बदललं आहे.
advertisement
पॉटी विकून खरंच पैसे मिळतात?
हे ऐकायला जितकं विचित्र वाटतं तितकंच ते इंटरेस्टिंग आहे. पॉटी विकून खरोखरच इतके पैसे कमवता येतात का? असा प्रश्न पडतो. तर हो. हे खरं आहे. ह्युमन मायक्रोब्स आणि गुडनेचर सारख्या काही कंपन्या निरोगी लोकांकडून मल दान करण्यासाठी पैसे देतात. ह्युमन मायक्रोब्स प्रति स्टूल नमुन्यासाठी 500 डॉलर म्हणजे सुमारे 42000 रुपये देतात, जे दररोज दान केल्यास दरवर्षी 180000 डॉलर्स म्हणजे सुमारे सुमारे 1.5 कोटीपर्यंत कमवू शकतात. गुडनेचरमध्ये मलदात्यांना दरमहा 1500 डॉलर्स म्हणजे सुमारे 1.25 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by PAID TO POOP (@paid.to.poop)



advertisement
पण मलदाता बनणं सोपं नाही. अर्जदारांपैकी फक्त 2-4% अर्जदार यासाठी पात्र ठरतात. कारण यासाठी काही अटी आणि नियम आहेत. यासाठी वय 18-50 वर्षांच्या दरम्यान असावं, जीवनशैली निरोगी असावी, आतड्यांची नियमित आणि निरोगी हालचाल असावी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग किंवा ड्रग्ज/अल्कोहोलचा इतिहास नसावा.
advertisement
पॉटीचं काय करतात?
वैद्यकीय शास्त्रात मल दानाचे महत्त्व वाढत आहे. फेकल माइक्रोबायोटा ट्रांसप्लांट म्हणजेच FMT द्वारे निरोगी व्यक्तीचं मल आजारी व्यक्तीच्या आतड्यात प्रत्यारोपित केलं जातं, ज्यामुळे आतड्यांमधील बॅक्टेरियाचं संतुलन पुनर्संचयित होतं. ही उपचारपद्धती C. diff, Crohn's disease आणि ulcerative colitis सारख्या आजारांमध्ये प्रभावी ठरत आहे. परंतु तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की तपासणीशिवाय मल दान करणं धोकादायक ठरू शकतं. कारण त्यात बॅक्टेरिया, विषाणू किंवा परजीवी संक्रमित होण्याचा धोका असतो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ऐकावं ते नवल! गरीब होताच जातो टॉयलेटमध्ये, बाहेर येताच होतो करोडपती, कसं काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement