होतं नव्हतं सगळं हिंदू कुकच्या नातीला दिलं, पारशी व्यक्तीचं मृत्यूपत्र पाहून सगळे आश्चर्यचकीत, असं का केलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Parasi man give property to cooks granddaughter : गुस्ताद यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यांची कुक त्यांची देखभालही करत होती. तिची नात अमिषा आजीसोबत गुस्ताद यांच्या घरी येत असे. तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती.
अहमदाबाद : एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याची संपत्ती असेल तर ती वारशानुसार मिळते. म्हणजे पतीची संपत्ती पत्नीला किंवा मुलांना. शक्यतो कुटुंबातील कुणाच्या तरी नावे ही संपत्ती होते. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. गुजरातमधील एका पारशी व्यक्तीने त्याची प्रॉपर्टी एका हिंदू कूकच्या नातीच्या नावे केली आहे. त्याचं मृत्यूपत्र पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
गुस्ताद बोर्जोरजी असं या व्यक्तीचं नाव आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते टाटा इंडस्ट्रीजमध्ये काम करत होते. त्यांच्या पत्नीचं 2001 मध्ये निधन झालं होतं. त्यांचा शाहीबागमध्ये 159 चौरस यार्डचा फ्लॅट होता. ते या फ्लॅटमध्ये राहत होते.
फेब्रुवारी 2014 मध्ये गुस्ताद यांचं निधन झालं. मृत्यूच्या एक महिनाआधी त्यांनी दोन साक्षीदारांसमोर त्यांचं मृत्युपत्र लिहिलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र उघडलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. गुस्ताद यांनी त्यांची प्रॉपर्टी त्यांचा फ्लॅट अमिषा मकवानाच्या नावावर ठेवला होता. जी त्यांच्या घरी असलेल्या कूकची नात होती.
advertisement
गुस्ताद यांच्यासोबत कुकच्या नातीचं खास नातं
गुस्ताद यांची कुक जेवण तर बनवायचीच. शिवाय गुस्ताद यांची देखभालही तीच करत होती. तिची नात अमिषा आजीसोबत गुस्ताद यांच्या घरी येत असे. तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती. ती गुस्तादला काका मानत होती. गुस्तादही तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत असे. त्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. ते तिच्या शाळेची फी भरत असत. तिचा ड्रेस, पुस्तक आणि सर्व अभ्यास साहित्याचा खर्च ते स्वतः करत असत.
advertisement
जेव्हा मृत्यूपत्र बनवलं तेव्हा अमिषा अल्पवयीन होती, म्हणून गुस्तादने त्याचा पुतण्या बहराम इंजीनिअरला मृत्युपत्राचा कार्यकारी अधिकारी बनवलं. अमिषा प्रौढ होईपर्यंत बहराम तिचा कायदेशीर पालक राहिला. अमिषा आता एका खाजगी कंपनीत एचआर आहे. प्रौढ झाल्याने 2023 मध्ये तिने वकील आदिल सय्यद यांच्याकडे संपर्क साधला. तिने मृत्युपत्राच्या मंजुरीसाठी दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला.
advertisement
अमिषाने कोर्टात सांगितलं, त्यांचं नातं खूप खास होतं. ती त्यांना ताई म्हणायची. ते तिच्यासाठी आई आणि वडील दोन्ही होते. त्यांना तिला दत्तक घ्यायचं होतं. पण ते पारसी होते, तसंच त्यांना तिचा धर्म, ओळख बदलायची नव्हती. तसंच तिच्या बायोलॉजिकल पालकांपासून वेगळं करायचं नव्हतं. तिला नेहमीच दोन्ही कुटुंबाचं प्रेम मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिला दत्तक घेतलं नाही.
advertisement
सासू गुपचूप उघडायची सुनेचं पार्सल, महिलेने शिकवला धडा, ऑर्डर केली अशी वस्तू, संपूर्ण कुटुंब धक्क्यात
ती गुस्ताद यांच्यासोबतच राहत होती. त्यांच्या मृत्यूपर्यंत तिने त्यांची काळजी घेतली. ते तिच्यावर आपल्या मुलीसारखे प्रेम करत असत. त्यांनी प्रेम आणि आपुलकीने 12 जानेवारी 2014 रोजी मृत्युपत्राद्वारे त्याची मालमत्ता तिला दिली, असं ती म्हणाली.
advertisement
कोर्टाने मृत्यूपत्राला दिली मंजुरी
कोर्टाने याची सार्वजनिक सूचना जारी केली. त्यावर आक्षेप मागवण्यात आले. कोणीही आक्षेप घेतला नाही. त्यांना मुलं नव्हती. गुस्ताद यांना कोणताही कायदेशीर वारस नव्हता. गुस्ताद यांच्या पुतण्यानेही अमिषा मकवानाच्या नावे ना हरकत प्रमाणपत्र दिलं. 2 ऑगस्ट रोजी अहमदाबादच्या दिवाणी न्यायालयाने अमिषाच्या नावे मृत्युपत्र मंजूर केलं आणि तिला उत्तराधिकार प्रमाणपत्र दिलं. न्यायालयाच्या आदेशानंतर तो फ्लॅट आता त्या मुलीला देण्यात आला जी त्यांची नातेवाईक नव्हती.
Location :
Gujarat
First Published :
August 07, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/Viral/
होतं नव्हतं सगळं हिंदू कुकच्या नातीला दिलं, पारशी व्यक्तीचं मृत्यूपत्र पाहून सगळे आश्चर्यचकीत, असं का केलं?