या शिबिरात एका तरुणाने येऊन रक्तदान केल्याचं सांगण्यात येत आहे. दान केलेल्या रक्ताची तपासणी केली असता, ती व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले. सुदैवाने दुसऱ्या रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्ताची तपासणी करण्यात आली. जर हे रक्त एखाद्या निष्पाप व्यक्तीला दिले गेलं असतं तर त्या व्यक्तीचा जीव धोक्यात आला असता.
आश्चर्यम! एकाच हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 14 नर्स एकत्र प्रेग्नंट
advertisement
जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं तेव्हा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची तपासणी केली जाते. त्याचा रक्तगट, त्याचा रक्तदाब, सर्वकाही मोजलं जाते. पण इथं चाचणीची सुविधा नसल्याने, त्या तरुणाने आरामात रक्तदान केलं आणि तिथून निघून गेला. नंतर रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्त तपासणी केली असता, त्या व्यक्तीला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलं आणि एकच खळबळ उडाली.
यानंतर रक्ताचे पॅकेट ताबडतोब वेगळे करण्यात आले. नंतर त्यावर स्टिकर्स लावून रक्तफेकून देण्यात आलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पण कोणतंही रुग्णालय रक्त देण्यापूर्वी त्या व्यक्तीची निश्चितच तपासणी करते. संक्रमित रक्ताचा वापर केला जातो अशी फारच कमी प्रकरणं आहेत. तेही बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे घडते.
सकाळी अलार्म वाजताच उठणं ठरू शकतं जीवघेणं, डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका
व्हायरल होणारा रक्तदानाचा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. न्यूज18मराठी याची खातरजमा करत नाही. @vloguniversal इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.