TRENDING:

बाबो! दिवसभर फक्त फोनवर बोलून तरुणाने महिनाभरातच कमावले 4.5 कोटी; कमाईची पद्धत पाहून पोलीसही शॉक

Last Updated:

21 वर्षांचा हा तरुण दिवसभर फोनवर बोलणं, खाते क्रमांक देणं अशी कामं तो करत असते. एका महिन्यात या तरुणाने साडेचार कोटी रुपये कमावले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजस्थान : पैसे कमवण्यासाठी लोक काय काय नाही करत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळावा अशी इच्छा कुणाची नसते. पण हे काही लगेच साध्य होत नाही. असं असताना एक 21 वर्षांचा तरुण ज्याने फक्त महिनाभरातच तब्बल 4.5 कोटी रुपये कमावले आहेत. त्याच्याकडे इतक्या कमी वेळात इतका पैसा आला कुठून हे पाहण्यासाठी म्हणून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्या कमाईची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले.
तरुणाला पोलिसांनी केली अटक
तरुणाला पोलिसांनी केली अटक
advertisement

राजस्थानच्या नागौरमधील हे प्रकरण आहे.  21 वर्षांचा सुफियान इस्माईल शेख. दिवसभर फोनवर बोलणं, खाते क्रमांक देणं अशी कामं तो करत असते. एका महिन्यात या तरुणाने साडेचार कोटी रुपये कमावले. सुफियानचा पाठलाग करताना नागौर पोलिसांनी मुंबई गाठली. त्याने आपल्या कमाईची पद्धत सांगितल्यावर अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

प्लॅटफॉर्मवर उभी होती 5 मुलं, GRP ला पाहून घाबरले; तपासणी केल्यानंतर रेल्वे पोलीसही हादरले

advertisement

पोलिसात तक्रार

पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार आली होती. तक्रारदारानं सांगितलं की काही लोकांनी G1 - SSGA एक्सचेंज आणि स्टडी क्लब नावाने एक गट तयार केला आहे. त्या गटातील व्यक्तींनी विविध खाते क्रमांकावर एकूण 87.03 लाख रुपये जमा करून त्यांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

advertisement

आरोपी सुफियानचे आंतरराज्यीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीशी संबंध होते. त्याने देशभरात 72 ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडवून आणल्या. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एका महिन्यात त्याने एकूण 4 कोटी 45 ​​लाख रुपयांची फसवणूक केली. संपूर्ण रक्कम इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केली. आरोपीनं त्याचं करंट अकाऊंट उघडलं होतं. तो सायबर गुन्हेगारांना अकाऊंट उपलब्ध करून द्यायचा. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक बँक खाती गोठवली आहेत.

advertisement

दारू पिऊन शेतात झोपली महिला; सकाळी अशा अवस्थेत आढळली की सर्वांनाच धक्का

आरोपीला अटक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
सर्व पहा

नागौरचे एएसपी सुमित कुमार यांनी सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक टीम तयार केली होती. पोलीस ठाण्याचे अधिकारी मनीष देव यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने मुंबई गाठून मुख्य आरोपी सुफियान इस्माईल शेख याला अटक केली. 87 लाखांच्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात ही संपूर्ण कारवाई पथकाने केली.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
बाबो! दिवसभर फक्त फोनवर बोलून तरुणाने महिनाभरातच कमावले 4.5 कोटी; कमाईची पद्धत पाहून पोलीसही शॉक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल