भारतातील एका कंपनीत नोकरी करणारी ही व्यक्ती. या व्यक्तीने भारतातील कॉर्पोरेट कल्चरचा त्याच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे सांगितलं आहे. व्यक्तीने रेडिट या सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे.
त्याने सांगितलं की, "तुमच्यासारखाच मीसुद्धा माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून टॉक्सिक वर्क कल्चरमध्ये अडकलो आहे. माझ्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा मी सतत प्रयत्न करतो. मी बहुतेक वीकेंडला काम केलं, सुट्ट्या रद्द केल्या, कामाला प्राधान्य दिलं. त्याबदल्यात मला काही पैसे मिळाले. पण मागे पाहिलं तर मला आनंद नाही मिळाला, मी आनंदी नाही."
advertisement
हनीमूनची घाई! लग्नाआधीच बुक केलं 11 लाखांचं तिकीट, आता म्हणे, वाटतेय भीती, पण कशाची?
"आता जवळपास 3 वर्षे झाली. दररोज मी माझ्या ऑफिसच्या कामात 14 ते 16 तास घालवतो. माझ्या झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. कधी मी रात्री वाजता झोपतो तर कधी मध्यरात्री 2 वाजता. तरी सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये असतो. मागे पाहिलं वळून पाहिलं तर मी खूप काही शिकलं पण त्याचवेळी नाण्याची दुसरी बाजू वेदनादायी आहे. माझ्या आईलाही माझ्याबाबत सतत चिंता असते.", असं तो म्हणाला.
पुढे त्याने सांगितलं, "माझी पर्सनल लाइफ राहिली नाही. गेली अडीच वर्षे मी कुठेच फिरायला गेलो नाही. अगदी इथं बंगळुरूतील नंदी हिललाही गेलो नाही. माझ्या गर्लफ्रेंडकडे दुर्लक्ष केलं. तीच काय माझ्या आयुष्यातील एकमेव सकारात्मक गोष्ट आहे. ऑगस्ट 2022 मध्ये नोकरी सुरू केल्यापासून माझं वजन 24 किलो वाढलं आहे. मी आता खूप थकलो आहे. आता माझ्याकडे नीट ब्रेक घ्यायला किंवा मुलाखतीची तयारी करायला वेळ आणि एनर्जीही नाही."
Am I really dying ?
ही पोस्ट वाचल्यानंतर, लोकांनी Reddit वर अनेक प्रतिक्रिया दिल्या. कुणी त्याला नोकरी सोडू नका पण विश्रांती घ्या असं म्हटलं आहे. तर एकाने ताबडतोब नोकरी सोडा आणि ब्रेक घ्या असं सांगितलं आहे. तर काहींनी कामाचे तास, कामाच्या सीमा मर्यादित ठेवून कामाबाहेरील गोष्टी करण्याचा, आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
OMG! विशीत लग्न, तिशीत झाली 2 मुलं, चाळीशीत कपल...; मुलांनाही लाजवेल असा VIDEO
तुमचा तुमच्या कामाबाबत काय अनुभव आहे आणि या परिस्थिती तुम्ही काय सल्ला द्याल, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.