ज ही एक जलचर कृमी आहे. ती त्वचेवर चिकटून रक्त शोषते. काही उपचारपद्धतीत जळूचा वापर केला जातो. लीच थेरपी ज्याला हिरुडोथेरपी असंही म्हणतात. या प्रक्रियेत जळू आपल्या लाळेतून काही औषधी घटक रक्तात सोडते, जे उपचारात्मक ठरतात, असं सांगितलं जातं. पण चीनमधील 23 वर्षांच्या व्यक्तीने जळूचा वापर नको त्या ठिकाणीच केला. त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये जळू सोडला.
advertisement
'पालक पनीर'ने लावली वाट; 2 भारतीय विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त
चीनमधील हेनान प्रांतातील झेंगझोऊ येथील ही धक्कादायक घटना आहे. झेंग नावाचा 23 वर्षांचा हा तरुण. तो एका आजारावर इंटरनेटवर उपचार शोधत होता. एका उपायात जळू हा आजार बरा करू शकतो असा दावा करण्यात आला. झेंगने या उपायावर विश्वास ठेवला. त्याने 5 सेंटीमीटर लांबीचा एक जिवंत जळू खरेदी केला. ऑनलाइन जसं सांगितलं तसं त्याने केलं. झेंगने त्याच्या मूत्रमार्गात जळू घातला.
काही वेळातच त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याची लघवी पूर्णपणे थांबली. मूत्रमार्गात गेल्यानंतर जळू हळूहळू त्याच्या मूत्राशयापर्यंत पोहोचला आणि तिथंच चिकटून राहिला. झेंगच्या वेदना वाढल्या आणि त्याची प्रकृती गंभीर झाली. जेव्हा वेदना असह्य झाली, तेव्हा त्याने रुग्णालयात धाव घेतली. जेव्हा त्याने डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा तेसुद्धा क्षणभर गोंधळले. त्याचं लगेच अल्ट्रासाऊंड केलं, ज्यामध्ये त्याच्या मूत्राशयात जळू स्पष्टपणे दिसत होता.
बाबांना 2-2 बायका, मला एकही नाही! लग्नासाठी आसुसलेला 35 वर्षांचा लेक, रागात वडिलांसोबत नको ते कृत्य
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, मूत्रविज्ञान विभागाच्या टिमने ऑपरेशन केलं. खूप प्रयत्नांनंतर डॉक्टरांना त्याच्या मूत्राशयातून जळू काढण्यात यश आलं. यानंतर झेंगच्या वेदना कमी झाल्या आणि तो सामान्यपणे लघवी करू शकला.
झेंगझोउ पीपल्स हॉस्पिटलमधील मूत्रविज्ञान विभागाचे संचालक डॉ. शान झोंगजी म्हणाले की, अशा मूर्ख कृतींमुळे मूत्रमार्ग आणि मूत्राशयाला गंभीर नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे भविष्यात संसर्ग, सतत वेदना आणि गंभीर मूत्र समस्या उद्भवू शकतात. या घटनेने हे सिद्ध होतं की ऑनलाइन मिळणाऱ्या प्रत्येक उपचारांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. आरोग्याच्या बाबतीत फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे.
