'पालक पनीर'ने लावली वाट; 2 भारतीय विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त

Last Updated:

Palak Paneer : दोन भारतीय विद्यार्थ्यांसाठी घरी बनवलेले पालक पनीर त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा खलनायक बनला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं.

AI Generated Image
AI Generated Image
वॉशिंग्टन : पालक पनीर कित्येकांच्या आवडीचा पदार्थ. एरवी पालक न खाणारेही पालक पनीर मात्र आवडीने खातात. पण याच पालक पनीरमुळे 2 भारतीय विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त झालं आहे. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. नेमकं हे कसं काय, काय घडलं? असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील.
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचं करिअर पालक पनीरने संपवलं. ऐकायला विचित्र वाटेल तरी, अमेरिकेतील कॉलोराडो बोल्डर युनिव्हर्सिटीत झालेल्या लंच बॉक्स वादामुळे न्यायालयीन खटला सुरू झाला. शेवटी युनिव्हर्सिटीने आपली चूक मान्य केली आणि विद्यार्थ्यांना 200000 डॉलर म्हणजे अंदाजे 1.6 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. पण विद्यार्थ्यांना त्यांची पीएचडी सोडून देऊन या वादाची किंमत मोजावी लागली.
advertisement
हे संपूर्ण प्रकरण 5 सप्टेंबर 2023 चं आहे. भोपाळचा आदित्य प्रकाश हा कोलोरॅडो बोल्डर युनिव्हर्सिटीत मानववंशशास्त्रात पीएचडी करत होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी आदित्य त्याच्या विभागाच्या कॉमन एरियामध्ये गेला आणि त्याने पालक पनीर असलेला त्याचा डबा मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवला. तेवढ्यात युनिव्हर्सिटीचा एक कर्मचारी आला आणि त्याने घाणेरडा वास येत असल्याचं सांगत आदित्यला मायक्रोवेव्ह बंद करायला सांगितलं.
advertisement
आदित्य म्हणाला, "हे फक्त अन्न आहे, त्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. मी ते गरम करून लगेच निघून जाईन." पण प्रकरण तिथंच संपलं नाही. युनिव्हर्सिटी प्रशासनाने एक मोठा मुद्दा निर्माण केला. या वादाचा परिणाम केवळ आदित्यवरच झाला नाही तर त्याची सहकारी विद्वान उर्मी भट्टाचार्यवरही झाला, जी कोलकात्यातील येथील रहिवासी आहे आणि वैवाहिक बलात्कारावर संशोधन करत होती.
advertisement
दोन दिवसांनंतर जर इतर कोणत्याही भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतःचं जेवण आणलं तर त्यांच्यावर दंगल भडकवण्याचा आरोप लावण्याची धमकी विद्यापीठ प्रशासनाने दिली.  आदित्य प्रकाशविरोधात अनेक वरिष्ठ प्राध्यापकांच्या बैठका झाल्या. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटल्याचा आरोप होता. उर्मी भट्टाचार्यला कोणतीही पूर्वसूचना न देता तिच्या अध्यापन सहाय्यकपदावरून काढून टाकण्यात आलं, ज्यामुळे तिच्या आर्थिक आणि शैक्षणिक कल्याणावर गंभीर परिणाम झाला.
advertisement
आदित्य आणि उर्मी यांचा आरोप आहे की विद्यापीठाचा दृष्टिकोन भेदभावपूर्ण होता.  विद्यापीठाने दिलेली अशी वागणूक आणि मानसिक छळाविरुद्ध दोन्ही विद्यार्थ्यांनी कोलोरॅडो जिल्हा न्यायालयात अपील केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की विद्यापीठ दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांशी भेदभाव करतं आणि त्यांना त्यांचे जेवणाचे डबे उघडण्यासाठी वेगळ्या संस्थेत जाण्याची सक्ती करतं.
advertisement
दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर निकाल लागला. विद्यापीठाने दोन्ही विद्यार्थ्यांना एकूण 200,000 डॉलर्स म्हणजे जवळपास 1.6 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. पण कराराअंतर्गत विद्यापीठ त्यांना पीएचडी पदवी देणार नाही, तर त्यांना फक्त पदव्युत्तर पदवी देईल. भविष्यात हे दोन्ही विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेऊ शकणार नाहीत किंवा तिथं कोणत्याही प्रकारची नोकरी करू शकणार नाहीत.
advertisement
आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य त्यांच्या अपूर्ण पीएचडी आणि कटू अनुभवांसह भारतात परतले. आदित्यला पीएचडी अनुदान मिळत होतं पण एका छोट्याशा अन्न वादामुळे आणि सांस्कृतिक असहिष्णुतेने दोन  विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'पालक पनीर'ने लावली वाट; 2 भारतीय विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement