संजय असं या पुरुषाचं नाव. त्याने एका निष्पाप मुलीला समोसे देऊन आमिष दाखवलं. त्या निष्पाप मुलीला त्याच्या वाईट हेतूंची जाणीव नव्हती. संजय तिला एका ओसाड जागेवर घेऊन गेला. तिथे त्याने प्रथम मुलीवर बलात्कार केला आणि नंतर आपले दुष्कृत्य लपवण्यासाठी त्याने तिची निर्घृण हत्या केली. ही 2007 ची घटना होती.
एक वर्षाने लहान नवरा, बायकोला स्पर्श केला नाही, 6 महिने संबंधच ठेवले नाही, नात्याचा शेवट मृत्यू
advertisement
त्याच्या कृत्यामुळे न्यायालयाने 2010 मध्ये त्याला दोषी ठरवलं. 2010 मध्ये द्वारका अतिरिक्त सत्र न्यायालयाने संजयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, जी 2014 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवली. त्याच्या शिक्षेचा काही भाग पूर्ण केल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने 15 जून 2021 रोजी त्याला पॅरोल मंजूर केला. पॅरोलचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो आत्मसमर्पण करण्याऐवजी गायब झाला.
29 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने संजयला पुन्हा अटक केली आहे. पॅरोलवर सुटल्यानंतर संजय चार वर्षांहून अधिक काळ फरार होता. कायद्यापासून वाचण्यासाठी संजयने त्याचे नाव बदलून 'सुजॉय' केलं होतं आणि तो बिहारच्या वेगवेगळ्या भागात फिरत असे. या काळात त्याने आपलं गुन्हेगारी वर्तन सुरूच ठेवले. त्याने दोनदा लग्न केलं. एका पत्नीपासून त्याला एक मूल आहे. दुसरी पत्नी प्रेग्नंट आहे.
लग्नादिवशी फक्त एक रात्र घालावली, प्रेग्नंट झाली, जुळ्या मुलींचा जन्म पण बापाचा चेहराच विसरली आई
डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितलं की, आरोपी 2003 मध्ये एका निर्यात कंपनीत काम करण्यासाठी दिल्लीला आला होता. त्याने त्याच्या मूळ गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं. सध्या त्याच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही आणि तो पूर्णपणे त्याच्या वडिलोपार्जित शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे.
