ग्वाल्हेरमध्ये राहणारं हे जोडपं. व्यक्तीला सोशल मीडियावर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती लगेच स्वीकारली. त्यांच्यात प्रेम सुरू लागलं. एकदा या महिलेने त्याला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. तो हॉटेलमध्ये गेला. पण दार उघडलं तर काय, समोर चक्क त्याची बायको उभी होती.
advertisement
नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी बायकोनेच असा सापळा रचला की तो अवाक झाला. नवऱ्याला फ्लर्टिंग आणि नवीन महिलांशी प्रेमसंबंध ठेवण्याची हौस होती. बायकोला हे माहित होते. तिला त्याच्यावर संशय होता. याबाबत त्य़ाला विचारलं तेव्हा त्याने तिला शिव्या दिल्या. त्याने ते मान्य नाही. त्याने बायकोने आपल्यावरील लावलेले आरोप फेटाळले. मग एके दिवशी तिने त्याला रंगेहाथ पकडायचं ठरवलं.
तिने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पायल नावाने फेक अकाउंट तयार केलं आणि त्याद्वारे तिच्या पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. एका अनोळखी महिलेकडून मैत्रीचं आमंत्रण पाहून पतीने लगेच ते स्वीकारलं. त्यानंतर तिने त्याला एकदा फोन केला आणि हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. प्रेयसीकडून आमंत्रण मिळताच तो ताबडतोब हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याला धक्का बसला. इथे त्याच्या प्रेयसीऐवजी त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती.
वाजतगाजत वरात घेऊन आला, वधूचं घर पाहिलं आणि नवरदेवाने ठोकली धूम, असं काय दिसलं?
पत्नीने पतीला रंगेहाथ पकडलं आणि त्याल चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसात त्याने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगितलं. पत्नीने सगळे पुरावे पोलिसांन दिले. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकण्याची भीती घातली. तेव्हा त्याने आपला गुन्हा मान्य केला. पत्नीची माफी मागितली आणि असं कृत्य पुन्हा करणर नाही, अशी शपथही घेतली.