वाजतगाजत वरात घेऊन आला, वधूचं घर पाहिलं आणि नवरदेवाने ठोकली धूम, असं काय दिसलं?

Last Updated:

Wedding news : वधूपक्ष वरातीची आतुरतेने वाटत पाहत होती. वरात घराजवळ आलीसुद्धा पण वधूच्या घरी त्यांनी असं काही पाहिलं की नवरदेवाने वरातीसह तिथून पळ काढला. लग्नाचं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.

News18
News18
लखनऊ : नवरदेव लग्नाची वरात घेऊन नवरीच्या दारात येतो. नवरी आणि तिचं कुटुंब वरातीची आतुरतेने वाट पाहत असतात. असंच एक कुटुंब ज्यांच्या घरात मुलीचं लग्न होतं. ते लोक वरातीची आतुरतेने वाटत पाहत होती. वरात घराजवळ आलीसुद्धा पण वधूच्या घरी त्यांनी असं काही पाहिलं की नवरदेवाने वरातीसह तिथून पळ काढला. उत्तर प्रदेशमधील लग्नाचं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.
औरैया जिल्ह्यातील पूर्वा पट्टी गावातील हे प्रकरण. इथं राहणाऱ्या राजेशच्या मुलीचं लग्न 6 मार्च रोजी होतं. लग्नाची मिरवणूक कानपूर गावाहून ठरलेल्या वेळी आली. समारंभाच्या वेळी, वराच्या बाजूने अचानक अपाचे बाईक आणि अतिरिक्त 50 हजार रुपयांची मागणी केली. ज्यावर वधू पक्षाने सांगितलं की लग्नाचे कार्यक्रम होऊ दे, तुमची जी काही मागणी असेल ती पूर्ण केली जाईल. वराच्या बाजूने तयारी सुरू करायला सांगितलं.
advertisement
वधूपक्ष वरातीची वाट पाहत होतं. पण नवरदेव वरात घेऊन आलाच नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही लग्नाची वरात आली नाही तेव्हा त्यांनी चौकशी केली. वरासह लग्नाची वरात आल्या पावली परत गेल्याचं त्यांना समजलं. वधूच्या आईने सांगितलं की लग्नाची वरात 6 मार्च रोजी आली होती. वर पक्षाला आरामात बसवलं होतं आणि त्यांना नाश्तापाणी दिलं. पण जेव्हा स्वागताची वेळ आळी तेव्हा नवरदे आलाच नाही, वरातही दारात आली नाही.
advertisement
वधूच्या भावाने सांगितले की जेव्हा लग्नाची मिरवणूक आली तेव्हा त्याने त्यांची वाहनं पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यात काही ड्रायव्हर्स होते, त्यांनी त्यांच्याशी झटापट केली. वराचे मामा ब्रजकिशोर दाराकडे आले. त्यानंतर त्यांनी 50 हजार रुपये आणि अपाचे मोटारसायकलची मागणी केली. यावर त्यांना सांगण्यात आलं की, सर्वप्रथम दारावरील विधी करा, तुमची जी काही मागणी असेल ती पूर्ण होईल. वर पक्षाने लग्नाची मिरवणूक आणण्यास सांगितलं. त्यानंतर 20 मिनिटं कोणतीही हालचाल दिसली नाही. लग्नाची मिरवणूक शांतपणे निघून गेली.
advertisement
पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. आई म्हणते की तिच्या मुलीला या कृत्यामुळे खूप दुःख झालं आहे. ती आयुष्य संपवणार असल्याचं म्हणते आहे.
मराठी बातम्या/Viral/
वाजतगाजत वरात घेऊन आला, वधूचं घर पाहिलं आणि नवरदेवाने ठोकली धूम, असं काय दिसलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement