Couple Age Gap : नवरा-बायकोच्या वयात किती अंंतर हवं, विज्ञान काय सांगतं?

Last Updated:

Couple age gap for marriage : समाज आणि विज्ञान या दोन्ही दृष्टीकोनातून लग्नात वयाचा फरक महत्त्वाचा आहे. आपल्या समाजात साधारणपणे असं मानलं जातं की पती पत्नीपेक्षा मोठा असावा, पण ते खरोखर आवश्यक आहे का?

News18
News18
नवी दिल्ली : खरंतर प्रेमात वय महत्त्वाचं नसतं, पण जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा समाजाचे अनेक नियम त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः, पती-पत्नीमधील वयाच्या फरकाबद्दल नेहमीच चर्चा होते. आपल्या समाजात साधारणपणे असं मानलं जातं की पती पत्नीपेक्षा मोठा असावा, पण ते खरोखर आवश्यक आहे का? की हा फक्त जुना विचार आहे? याबद्दल विज्ञान आणि समाज काय म्हणतो ते जाणून घेऊया.
भारतीय समाजात लग्नासाठी 3 ते 5 वर्षांचा वयाचा फरक आदर्श मानला जातो. तसंच या समीकरणात पती पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा. ही श्रद्धा शतकानुशतके प्रचलित आहे, विशेषतः अरेंज मॅरेजमध्ये याचा खूप विचार केला जातो. तथापि, अशी अनेक लग्न झाली आहेत जिथं पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी आहे आणि ते यशस्वीदेखील झाले आहेत. शाहीद कपूर-मीरा राजपूत यांच्या वयात 15 वर्षांचा फरक आहे आणि प्रियांका चोप्रा-निक जोनास यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे, अशी अनेक प्रसिद्ध जोडपी आहेत, तरीही या कपलचं वैवाहिक जीवन आनंदी आहे.
advertisement
विज्ञान काय सांगतं?
आजच्या काळात प्रेमविवाहाचा ट्रेंड वाढत आहे, जिथं या वयातील फरकांना कमी महत्त्व दिलं जातं. मोठ्या शहरांमध्ये आता हा फरक महत्त्वाचा नाही. पण तरीही समाजात असा एक मोठा वर्ग आहे जो अजूनही या विचारसरणीला योग्य मानतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा फक्त समाजाने बनवलेला नियम आहे, तर तसं नाही. यावर विज्ञानही आपलं मत देते. विज्ञान याबाबत काय म्हणतं पाहुयात.
advertisement
शारीरिक आणि मानसिक परिपक्वता : मुली मुलांपेक्षा लवकर परिपक्व होतात. मुलींमध्ये हार्मोनल बदल 7 ते 12 वर्षांच्या वयात सुरू होतात, तर मुलांमध्ये हा बदल 9 ते 15 वर्षांच्या वयात होतो. म्हणूनच, महिलांची मानसिक समज आणि भावनिक स्थिरता पुरुषांपेक्षा लवकर विकसित होते.
advertisement
लग्नासाठी योग्य वय : भारतात मुलींसाठी लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे आहे. कायदेशीरदृष्ट्या, पती-पत्नीमध्ये 3 वर्षांचा फरक योग्य मानला जातो. जगभरातील देशांमध्ये लैंगिक संबंध आणि लग्नासाठी किमान वय वेगवेगळे असते.
कपलच्या वयातील योग्य अंतर किती?
समाजाच्या मते, योग्य वयातील फरक नातेसंबंधांमध्ये संतुलन राखण्यास मदत करतो. विज्ञानानुसार, योग्य वयातील फरक दोन्ही जोडीदार मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या किती प्रौढ आहेत यावर अवलंबून असतो. वैज्ञानिक तथ्य फक्त शारीरिक परिपक्वतेबद्दल बोलते. पण हार्मोनल बदल होताच लग्न करावंच असं नाही. तसंच, लग्न केवळ शारीरिक संबंधांवर आधारित नसतं. हेच कारण आहे की लग्नाचं वय केवळ वैज्ञानिक निकषांवर ठरवता येत नाही.
advertisement
तथापि, हे स्पष्ट आहे की कोणत्याही लग्नाचं यश वयाच्या फरकावर अवलंबून नसतं तर एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आदर आणि समजुतीवर अवलंबून असतं. वयाचा फरक तीन वर्षांचा असो किंवा पंधरा वर्षांचा, खरं यशस्वी नातं तेच असतं जिथं दोन्ही भागीदार एकमेकांची परिपक्वता आणि विचारसरणी समजून घेतात आणि एकमेकांना पाठिंबा देतात.
मराठी बातम्या/Viral/
Couple Age Gap : नवरा-बायकोच्या वयात किती अंंतर हवं, विज्ञान काय सांगतं?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement