ब्रिटनमधील कार्लिले इथं राहणारा 20 वर्षीय जेम्स क्लार्कसन ज्याने ख्रिसमसच्या वेळी नॅशनल लॉटरीमध्ये 120 पौंड म्हणजेच 12,676 रुपये जिंकले. यानंतर त्याने पुन्हा एकदा लॉटरी जिंकली आणि 7.5 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 80 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला. विशेष म्हणजे जेम्सने ख्रिसमसच्या दिवशी 12000 रुपयांची लॉटरी जिंकली होती आणि त्यासोबतच त्याने हे तिकीट खरेदी केलं होतं. जॅकपॉट जिंकल्याच्या बातमीनंतर जेम्स खूप खूश झाला आणि म्हणतो की हे अगदी स्वप्नासारखं होतं.
advertisement
VIDEO : महाकुंभाच्या गर्दीत हरवली सासू, रडून रडून सुनेची बेकार अवस्था, डबडबती नजर शोधतेय सासूला
लॉटरी जिंकल्याची बातमी आली तेव्हा जेम्स त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता आणि त्याने कुटुंबासोबत खाऊन पिऊन सेलिब्रेशन केलं. एका रात्रीत तो करोडपती झाला, गर्लफ्रेंडसोबत त्याने रात्र घालवली. मात्र, दुसऱ्या दिवशी जेम्स भल्या पहाटे रस्त्यावर दिसला. तो ज्या अवस्थेत रस्त्यावर होता ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
करोडपती झालेला जेम्स रस्त्यातील नाले साफ करत होता. जेम्स नाल्यांमधील तुंबलेले पाणी काढण्याचं काम करतो, हे त्याचं रोजचं काम. लॉटरी जिंकल्यानंतरही त्याने आपलं हे काम सोडलं नाही. कडाक्याच्या थंडीत तो नाले साफ करायला गेला. द मेट्रोच्या रिपोर्टनुसार, जेम्स म्हणतो की तो खूप लहान आहे, त्यामुळे त्याला काम थांबवायचं नाही आणि करोडो रुपयांचा मालक असूनही त्याला हवेत उडायचं नाही.