VIDEO : महाकुंभाच्या गर्दीत हरवली सासू, रडून रडून सुनेची बेकार अवस्था, डबडबती नजर शोधतेय सासूला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahakumbha 2025 : महाकुंभमेळ्यात एका रडणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिला रडण्याचं कारण विचारलं असता ती आपली सासू हरवल्याचं सांगते.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती, मंदिराच्या दानपेटीत एका पैशाच्या नोटेवर लिहून कुणीतरी आपल्या सासूच्या मरणाची मागणी केली होती. ही बातमी चांगलीच चर्चेत आली. यानंतर आता अगदी बरोबर याच्या उलट अशी एक घटना. जिथं एका महिलेची सासू हरवली आहे आणि सून तिच्यासाठी रडते आहे. सासू हरवली म्हणून या सुनेची रडून रडून बेकार अवस्था झाली आहे. महाकुंभातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
कुंभमेळा म्हणजे अफाट गर्दी आली. या गर्दीत कुणीतरी हरवण्याची भीती असतेच. अशीच एका महिलेची सासू या कुंभमेळ्याच्या गर्दीत हरवली. आता अशा कितीतरी महिला आहेत, ज्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे सुंठीवाचून खोकला गेला असाच असेल. पण ही महिला मात्र सासूसाठी ढसाढसा रडू लागली.
advertisement
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला रडताना दिसत आहे. महिलेला रडताना पाहून काही लोक तिच्या आजूबाजूला जमा झाले. त्यांनी तिला रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा महिला आपली सासू हरवल्याचं सांगते. आजूबाजूचे लोक त्हया महिलेला धीर देतात. घाबरू नको, घोषणा केली जाईल, तुझी सासू सापडेल, पोलीस तिला शोधून आणतील, रडू नकोस, असं सांगतात.
advertisement
पण महिलेच्या डोळ्यातील अश्रू काही थांबनेता. तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर महिला जरी लोकांशी बोलत असली तरी तिचे डबडबते डोळे, तिच्या नजरा मात्र कुंभमेळ्यात सगळीकडे फिरत आहेत. सासूला शोधत आहेत.
advertisement
@apna_bihar22 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'महाकुंभातील मार्मिक दृश्य, सासूसाठी रडणारी सून' असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
Location :
Delhi
First Published :
January 21, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : महाकुंभाच्या गर्दीत हरवली सासू, रडून रडून सुनेची बेकार अवस्था, डबडबती नजर शोधतेय सासूला