Naga Sadhu : नागा साधू कधीच ठेवत नाहीत शारीरिक संबंध, लैंगिक इच्छेवर कसं करतात कंट्रोल?

Last Updated:

Mahakumbh 2025 Naga Sadhu Secret Life : शारीरिक संबंध हीसुद्धा माणसाची एक गरज. असं असताना नागा साधू मात्र यापासून दूर राहतात. हे कसं शक्य आहे, याचं रहस्य एका नागा साधूने उघड केलं आहे.

नागा साधू
नागा साधू
नवी दिल्ली :  महाकुंभातील नाका सांधूंचं रहस्यमय जीवन नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतं. नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप खडतर असते. नागा साधू होण्यासाठी खूप कठीण परीक्षा द्याव्या लागतात. सगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्नांचा त्याग करावा लागतो. अगदी नागा साधूंना शारीरिक संबंधही ठेवता येत नाहीत. पण लैंगिक इच्छा ही नैसर्गिक, पण त्यावर नागा साधू कसं नियंत्रण मिळवतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
अन्न, पाणी, निवाऱ्याप्रमाणे शारीरिक संबंध हीसुद्धा माणसाची एक गरज. असं असताना नागा साधू मात्र संसाराचा त्याग करून शारीरिक संबंधापासूनही दूर राहतात. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. एका नागा साधूने हे रहस्य उघड केलं आहे. त्यांनी जगासमोर आणलं आहे.
नागा साधू बनण्याची गुप्त प्रक्रिया
मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथून आलेले दिगंबर विजयपुरी बाबा यांनी 'यूपी तक'ला नागा साधू बनण्याची गुप्त प्रक्रिया सांगितली.
advertisement
त्यांनी सांगितलं की, नागा साधू बनण्याची दीक्षा रात्री 2 वाजता सुरू होते. हा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो, तेव्हा साधकाचं मन शांत असतं.ही प्रक्रिया 48 तास चालते आणि अत्यंत गोपनीय ठेवली जाते.  दीक्षा घेताना साधूंना खास आयुर्वेदिक औषधी वनस्पती दिल्या जातात. या औषधी वनस्पती केवळ लैंगिक इच्छा दूर करत नाहीत तर ऋषीमुनींना मनावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास मदत करतात'
advertisement
"मनाला नेहमी इच्छा असतात, पण संत होण्यासाठी मनातील सर्व इच्छांचा त्याग करणं आवश्यक आहे. त्या पाहून जसं मिठाई खाण्याची इच्छा शमते, त्याचप्रमाणे वासनेवरही नियंत्रण होतं", असं त्यांनी सांगितलं.
नागा साधू बनण्याचा उद्देश
नागा साधू बनण्यासाठी 12 ते 13 वर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते. या काळात ऋषी सांसारिक सुखांचा त्याग करतात आणि आत्मसंयम आणि अध्यात्माकडे वाटचाल करतात. नागा साधू बनण्याचं मुख्य उद्दिष्ट मोक्षप्राप्ती आहे. त्याच्या तपश्चर्येचा उद्देश वारंवार जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणे हा आहे. महाकुंभातील नागा साधूंची तपश्चर्या आणि जीवनशैली भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची साधना आणि त्यागामुळे लोक आध्यात्मिक जीवनाकडे आकर्षित होतात.
मराठी बातम्या/Viral/
Naga Sadhu : नागा साधू कधीच ठेवत नाहीत शारीरिक संबंध, लैंगिक इच्छेवर कसं करतात कंट्रोल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement