पुणे : 'उखाणे' म्हणजे महाराष्ट्रातील एक गंमतीशीर परंपरा. लग्नात नववधू आणि वराने उखाणा घ्यायचाच असतो. परंतु लग्नानंतर विविध समारंभांमध्येही त्यांना एकमेकांचं नाव उखाण्यातून घ्यावं लागतं. काहीजणांना ही पद्धत आवडत नाही, तर काहीजण मात्र खूप हौशीने उखाणे पाठ करतात.
नववधूसाठी मंगळागौर हा अत्यंत खास सण असतो. या दिवशी ती पूजा करते, खेळ खेळते, आपल्या सख्यांना भेटते, नातेवाईक स्त्रियांना भेटते. अशावेळी तिला उखाणा घे, उखाणा घे असा आग्रह हमखास केला जातो. शिवाय या सोहळ्यात जमलेल्या तिच्या सख्याही हौशीने आपल्या नवऱ्याचं नाव उखाण्यातून घेतात. मंगळागौरीनिमित्त तुम्हीसुद्धा खास उखाणे घेऊ शकता. आम्ही तुम्हाला काही हटके ओळी सांगणार आहोत. आपल्या सख्या उमा पाटील आणि सीमा पारेख यांनी हे खास उखाणे सुचवले आहेत.
advertisement
हेही वाचा : तुम्हाला माहितीये का श्रावण महिन्यात का पुजतात मंगळागौर? काय आहे महत्त्व?
मंगळागौरीचं व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पाळलं जातं. अखंड विवाह, संतती, संततीचं रक्षण, कुटुंबात सुख-समृद्धीचं आगमन आणि उत्तम वैवाहिक जीवन, इत्यादीसाठी हे व्रत केलं जातं. चला मग पाहूया दर्जेदार उखाणे.
1. निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, रावांचे नाव घेते सर्वांचा ठेवून मान!
2. गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, रावांनी दिला मला प्रेमाचा हात!
3. जाई-जुईची वेल पसरली दाट, जाई-जुईची वेल पसरली दाट, रावांबरोबर बांधली जीवनाची गाठ!
4. संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका, संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका, रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका!
5. झूळझूळ वाहे वारा, मंद चाले होडी, झूळझूळ वाहे वारा, मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो रावांशी माझी जोडी!
6. हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, रावांमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे!
7. आई वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, आई वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, रावांमुळे पाहते मी दिवस सुखाचे!
8. यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला, यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला, रावांनी माझ्या हाती सौभाग्याचा कलश दिला!
9. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी!
10. खडीसाखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, खडीसाखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद!