इनसाइट 2018 ते 2022 पर्यंत मंगळावर राहिला आणि तिथं भूकंप आणि उल्कापिंडांच्या टक्करांमुळे निर्माण होणाऱ्या भूकंपीय लाटांची नोंद करत राहिला. पूर्वी असं मानलं जात होतं की मंगळाचा गाभा पूर्णपणे मऊ आणि वितळलेला आहे. परंतु आता असं समोर आलं आहे की पृथ्वीसारखा त्याच्या आत एक घन भाग आहे. भूकंपीय लाटांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की लाटा मंगळाच्या मध्यभागी आदळतात आणि परत परततात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तिथं घन थर असतो.
advertisement
OMG! NASA च्या बंद पडलेल्या सॅटेलाईटमधून आला मेसेज, कसा काय? शास्त्रज्ञही हैराण
मंगळावरील हा शोध इतका मोठा का आहे?
पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र त्याच्या गाभ्यामध्ये होणाऱ्या स्फटिकीकरण प्रक्रियेद्वारे राखलं जातं. पण आज मंगळावर कोणतंही जागतिक चुंबकीय क्षेत्र नाही. फक्त पृष्ठभागाच्या काही भागांवर जुने चुंबकीय ठसे आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मंगळावर देखील एकेकाळी एक मजबूत चुंबकीय ढाल होती, परंतु ती नाहीशी झाली आहे. आता नवीन पुरावे सूचित करतात की मंगळाचा गाभा आपण विचार केला त्यापेक्षा वेगळा आहे आणि ही त्याच्या चुंबकीय कथेची गुरुकिल्ली असू शकते.
मुख्य डेटा कसा मिळाला?
इनसाईटमध्ये फक्त एकाच ठिकाणी भूकंपमापक होता. पृथ्वीवर अशी अनेक स्थानकं आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी उल्कापिंडांच्या टक्करींचा फायदा घेतला. त्यांनी 23 मोठ्या आघात घटनांच्या लाटांचं विश्लेषण केलं. लाटांचा मार्ग, कोन आणि वेळ पाहून, टीमने सिद्ध केलं की मंगळाच्या आतून अशा लाटा परत येतात ज्या फक्त एका घन गाभ्यामधूनच शक्य आहेत.
शास्त्रज्ञांनी PKiKP आणि PKPPKP सारख्या लाटा पाहिल्या. या लाटा थेट मंगळाच्या आतील गाभ्याकडे गेल्या आणि तिथून इनसाईटमध्ये परतल्या. याचा अर्थ असा की मंगळाचं हृदय पूर्णपणे वितळलेलं नाही, तर त्याचा आतील गाभा घन आहे.
मंगळाचा गाभा विरुद्ध पृथ्वीचा गाभा
मंगळाचा गाभा देखील प्रामुख्याने लोखंडापासून बनलेला आहे, परंतु त्यात सल्फर, ऑक्सिजन आणि कार्बनचे प्रमाण जास्त आहे. हे हलके घटक गाभा मऊ ठेवतात. म्हणूनच शास्त्रज्ञांना वाटलं की मंगळाचा गाभा घन असू शकत नाही. परंतु नवीन शोधाने हा समज चुकीचा सिद्ध केला.
शास्त्रज्ञांच्या मते, मंगळाचा घन गाभा त्याच्या औष्णिक आणि रासायनिक इतिहासाची कहाणी सांगतो. यावरून मंगळाने त्याचे चुंबकीय क्षेत्र का गमावलं आणि तो राहण्यायोग्य ग्रह का बनू शकला नाही हे स्पष्ट होईल.
आता पुढचं पाऊल मॉडेलिंगचं आहे. या घन गाभ्याची निर्मिती कोणत्या प्रक्रियेमुळे झाली हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या तापमान आणि दाबाच्या परिस्थिती निर्माण करतील. यामुळे केवळ मंगळच नाही तर इतर खडकाळ ग्रहांचीही समज सुधारेल. हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.