खोदकामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लोकांनी डोंगरावरील माती खणून काढली. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ते माती दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी घेत आहेत, पण त्यांनी ती माती पाण्यात टाकली आणि धुतली तेव्हा त्यांना त्यात खजिना सापडला.
ज्यामध्ये दोन लोक डोंगरावर खोदकाम करत आहेत. खडक जमिनीत घुसले आहेत. ते काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे. दोघंही लोक अवजारांच्या सहाय्याने दगडखालची माती काढत आहेत आणि दगड फोडताना दिसत आहेत. ते दगड फोडतात. तो तोडण्यात खूप अडचण आहे, तरी दोघंही कसेतरी तळापर्यंत दगड खणतात. ते दगडखालची माती काढतात. नंतर ते माती प्लॅस्टिकच्या भांड्यात टाकून पाण्याने धुतात. माती काढून टाकल्यानंतर, एक चमकदार गोष्ट पाण्यात राहते, जी सोन्यासारखी दिसते.
advertisement
जंगलात होती कित्येक वर्षे जुनी विहीर, त्यात टाकला कॅमेरा; VIDEO पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला
@fishngold या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने हा व्हिडीओ बनावट असल्याचं म्हटलं आहे. अनेकदा असे व्हिडिओही बनावट असतात. लोक आधीच खजिना असा कुठेतरी लावतात आणि मग त्याचा व्हिडिओ बनवतात. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे असा दावा न्यूज18 हिंदी करत नाही.
ओसाड जमिनीत चाललेलं खोदकाम; आतून निघाली लाल रंगाची पेटी
याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काही लोक ओसाड जमीन खोदत आहेत. ते जमीन खोदण्यात व्यस्त होते. दरम्यान, त्यांना आत धातूच्या पेटीसारखं काहीतरी सापडलं, जे त्याचं नशीब उजळण्यास पुरेसं होतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, की अशी एखादी पेटी आम्हालाही सापडायला पाहिजे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _archeolog__ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
अंतराळात झाला मोठा स्फोट; कशाचा म्हणून शास्त्रज्ञांनी तपास केला आणि धक्काच बसला
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक यंत्राच्या साहाय्याने नापीक जमीन खोदण्यात गुंतले आहेत. दरम्यान, त्यांना आतमध्ये लाल रंगाची पेटी दिसली. त्याकडे पाहिल्यावर असं जाणवतं, की ती एक जुनी तिजोरी आहे, जी कदाचित काही काळापूर्वी जमिनीत गाडली गेली असावी. ते लोक बॉक्स बाहेर काढतात आणि नंतर तो धुवून इलेक्ट्रिक मशीनने कापतात. मग आतून जे बाहेर येतं ते थक्क करणारं आहे. बॉक्समध्ये नोटांचे बंडल, एक जुना फोन आणि एक छोटी सुटकेस देखील सापडली आहे. तीदेखील नोटांनी भरलेली.
