TRENDING:

माझी बायको! नवऱ्यांनी पोस्ट केले पत्नींचे फोटो, पाहून पोलीसही शॉक, फेसबुक ग्रुपच बंद केला, पण का?

Last Updated:

Facebook group closed : एक फेसबुक ग्रुप जिथं पती आपल्या पत्नींचे फोटो शेअर करत होतो. पण हा ग्रुप पाहिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. हा ग्रुपच बंद करण्यात आला आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रोम : आपल्या जोडीदाराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांची कमी नाही. माझा नवरा, माझी बायको, माय हबी, माय डार्लिंग, माय लव्ह असं म्हणत पार्टनरचे फोटो सोशल मीडियावर टाकले जातात. असाच एक फेसबुक ग्रुप जिथं पती आपल्या पत्नींचे फोटो शेअर करत होतो. पण हा ग्रुप पाहिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. हा ग्रुपच बंद करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

इटलीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. जिथं मिया मोगली म्हणजेच माझी पत्नी नावाचा एक फेसबुक ग्रुप बंद करण्यात आला आहे. हा ग्रुप 2019 पासून सक्रिय होता. या ग्रुपमध्ये 32000 हून अधिक पुरुष सक्रिय होते आणि ते पत्नी, मैत्रिणी आणि अगदी अनोळखी महिलांचे फोटो शेअर करत असत. धक्कादायक गोष्ट अशी होती की अनेक फोटो जोडीदारांनीच स्वतः काढले होते आणि महिलांच्या नकळत अपलोड केले होते.

advertisement

महिला कपडे बदलताना, सनबाथ घेताना, लैंगिक क्रियाकलाप करतानाचे प्रायव्हेट फोटो शेअर केले जात होते.

अजब प्रकरण! करोडपती बाप लेकीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडला, मुलांनाही जन्म दिला, कसा काय?

या पोस्टवर अश्लील कमेंट्स करण्यात आल्या होत्या, तसंच काही युझर्सनी विचित्र सूचनाही दिल्या होत्या.मेटा आणि स्थानिक पोलिसांना हा ग्रुप बंद करण्यासाठी 2000 हून अधिक तक्रारी आल्या. त्यानंतर डिजिटल गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या इटलीच्या पोस्टल पोलिसांनी या ग्रुपची फौजदारी चौकशी सुरू केली. अखेर 20 ऑगस्ट रोजी हा ग्रुप कायमचा बंद करण्यात आला. फेसबुकने ग्रुप बंद केला असला तरी, हजारो स्क्रीनशॉट आणि फोटो इतर प्लॅटफॉर्मवर आधीच पसरली आहेत.

advertisement

पोस्टल पोलिसांच्या उपसंचालक बारबरा स्ट्रॅपाटो म्हणाल्या, "ग्रुपमध्ये केलेल्या सर्व टिप्पण्या आमच्या माहिती प्रणालीमध्ये नोंदवल्या जातील. येथील गुन्हे बदनामीपासून ते परवानगीशिवाय खासगी फोटो शेअर करण्यापर्यंत आहेत. मी माझ्या कारकिर्दीत सोशल मीडिया ग्रुपमध्ये इतके त्रासदायक शब्द कधीही पाहिले नाहीत."

Airport Secret : एअरपोर्टवर गेट इतके दूर का असतात? आहे मोठा 'गेम', प्रवाशांना माहितीच नाही

advertisement

ग्रुपच्या अ‍ॅडमिननी, ज्यांची ओळख अद्याप उघड झालेली नाही, त्यांनी बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये सदस्यांना सांगितलं, "आम्ही एक नवीन खाजगी आणि सुरक्षित ग्रुप तयार केला आहे. नैतिकतेचे ढोंग करणाऱ्यांना निरोप आणि गैरवर्तन." अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हा नवीन ग्रुप टेलिग्रामवर तयार केला गेला असावा.

इटलीमध्ये 2019 पासून या गुन्ह्यासाठी एक कायदा लागू आहे. या कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने परवानगीशिवाय एखाद्याचे लैंगिक स्वरूपाचे फोटो शेअर केले तर त्याला सहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तथापि, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणतात की आता हा गुन्हा केवळ सूडातून वाढत नाही तर डेटा आणि गोपनीयतेचे उल्लंघन म्हणून वाढत आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
माझी बायको! नवऱ्यांनी पोस्ट केले पत्नींचे फोटो, पाहून पोलीसही शॉक, फेसबुक ग्रुपच बंद केला, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल