नवी दिल्ली : आजवर तुम्ही बऱ्याच हॉरर मुव्ही पाहिल्या असतील. एखादा भयानक हात छतातून, भिंतीतून बाहेर पडताना पाहिलं असेल. असंच काहीसं घडलं ते एका रेस्टॉरंटमध्ये. एका हॉरर फिल्मचा सीन वाटावा अशी ही घटना प्रत्यक्षात घडली. रेस्टॉरंटच्या छतातून अचानक एक भयानक हात बाहेर आला. पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारा आहे.
advertisement
थायलंडच्या बँकॉकमधील ही घटना आहे. एका रेस्टॉरंटमध्ये सगळे ग्राहक बसले होते. अचानक एक मोठा आवाज आला. रेस्टॉरंटचं छत तुटल्याचा हा आवाज. आवाजामुळे सगळ्याचं लक्ष तुटलेल्या छताकडे गेलं. अचानक त्या छताच्या तुटलेल्या भागातून एक भयानक हात खाली आला. मग काय सगळे घाबरले, सगळ्यांना दरदरून घाम फुटला. तिथं बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
OMG! कधी पाहिलाय का आकाशात उडणारा सिंह? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय Video
हात पाहिल्यानंतर तुम्हालाही क्षणभर वाटेल की हा भूताचा हात आहे की काय? पण नाही. व्हिडीओ तुम्ही नीट पाहाल तर पुढे एक प्राणी चालत जाताना दिसतो. तो एका प्राण्याचा हात. एक भलमोठा प्राणी. मोठी पाल किंवा सरडाच तो. ज्याला मॉनिटर लिझर्ड असं म्हणतात. त्याला पाहून सगळे ओरडू लागले, घाबरून खुर्च्यांवरून उटले आणि काही लोक रेस्टॉरंटमधून बाहेर पळाले.
या मॉनिटर लिझर्डला पाहून असं वाटलं जणू ते एखाद्या अॅक्शन चित्रपटातील दृश्य आहे. लोक म्हणत आहेत की हे दृश्य 'जुरासिक पार्क'सारखं दिसत होतं. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब स्थानिक वन्यजीव अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मॉनिटर लिझर्ड सुरक्षितपणे पकडला आणि त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं. सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही आणि सर्व सुरक्षित आहेत.
थायलंडमध्ये मॉनिटर सरडे सामान्यतः दिसतात, परंतु निवासी भागात किंवा सार्वजनिक ठिकाणी ते अचानक दिसणं दुर्मिळ आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्णता आणि अन्नाचा शोध त्यांना मानवी क्षेत्रांकडे आकर्षित करू शकतो.
आई लेकरांना अंघोळ घालतानाचा VIDEO, पण पोरांना पाहून नेटिझन्स घामाघूम
या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे आणि लोक तो सतत शेअर करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे. युझर्स यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. काहींनी याला हॉरर चित्रपटाचा ट्रेलर म्हटलं, तर काहींनी लिहिलं की आता बाहेर जेवणं चांगलं नाही. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला काय वाटलं, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.