आई लेकरांना अंघोळ घालतानाचा VIDEO, पण पोरांना पाहून नेटिझन्स घामाघूम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman bathing Snake video : आई मुलांना अंघोळ घालते. म्हणजे तुमच्यासमोर एक सामान्य दृश्य आलं असेल. पण हे दृश्य मात्र तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे.
नवी दिल्ली : आई आणि मुलांचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आई मुलांना अंघोळ घालतानाचा हा व्हिडीओ. पण या व्हिडीओतील मुलांना पाहून नेटिझन्सना मात्र घाम फुटला आहे. आता असं या व्हिडीओ काय आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
आई मुलांना अंघोळ घालते. म्हणजे तुमच्यासमोर एक सामान्य दृश्य आलं असेल. पण हे दृश्य मात्र तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे. कारण यातील आई तर माणूस आहे पण मुलं मात्र साप आहे. हो एक महिला चक्क सापांना अंघोळ घालताना दिसली आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेने एक टब घेतलं आहे, त्यात पाणी आहे आणि या पाण्यात ती एका सापाला बुडवत आहे. जशी एखादी आई आपल्या मुलाला चोळून चोळून अंघोळ घालते अगदी तसंच ती या सापाला अंघोळ घालते आहे. सापही तिला काहीच करत नाही.
आणखी आश्चर्य म्हणजे समोर आणखी दोन साप बसलेले दिसत आहेत. जे त्या सापाला अंघोळ करताना पाहत आहेत. जणून आपल्या एका भावाला अंघोळ घातली जात आहे आणि दोघं त्याला पाहत बसले आहेत असंच हे दृश्य दिसत आहे.
advertisement
Kitni bhi thandi ho mummy bina nehlaye nhi manti 😂 pic.twitter.com/pcwimYRMsk
— Aastha
कितीही थंडी हा असेना आई अंघोळ घातल्याशिवाय ऐकत नाही, असं कॅप्शन या व्हिडीओच्या पोस्टला देण्यात आलं आहे.
दरम्यान सापाला अंघोळ घालतानाचा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधीसुद्धा एका व्यक्तीने अगदी साबण लावून, घासून सापाला अंघोळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Location :
Delhi
First Published :
April 27, 2025 3:43 PM IST