पिंटू मल्लाह प्रयागराजच्या नैनीच्या अरेल परिसरातल राहणारा. त्याच्या कुटुंबात जवळपास 100 लोक आहेत. हे कुटुंब नाविक कुटुंब आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. या कुटुंबाने 45 दिवसांच्या कुंभमेळ्यात तब्बल 30 कोटी रुपये कमवले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा या कुटुंबाचं कौतुक केलं आहे. आता पिंटू मल्लाहच्या कुटुंबाने असं केलं तरी काय, इतका पैसा कसा कमावला हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
Weird Place : असं ठिकाण जिथं मूल जन्मालाच येत नाही, रहस्य काय?
पिंटू मल्लाहच्या कुटुंबाने कुंभमेळ्यात जाण्याची तयारी कित्येक महिने आधी सुरू केली होती. संपूर्ण कुटुंबाने मिळून 130 बोटी तयार केल्या. जेणेकरून कुंभमेळ्यात जास्तीत जास्त कमाई होईल. यादरम्यान पैशांची गरज लागली तेव्हा त्याला त्यासाठी आईचे दागिने गहाण ठेवावे लागले. आपले सगळे पैसे बुडणार तर नाहीत ना अशी भीती त्याच्या आईला होती. पण कुंभमेळा संपन्न झाला आणि कमाईही चांगली झाली. तेव्हा तिचा आनंदही गगनात मावेनासा झाला. मुख्यमंत्र्यांनीही त्यांची मेहनत आणि इमानदारीचं कौतुक केलं त्यामुळे मल्लाह कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे.
45 दिवस चाललेल्या या महाकुंभात पिंटू मल्लाहच्या कुटुंबाने तब्बल 30 कोटी रुपये कमवले. आकडा वाचूनच लोकांना आश्चर्य वाटलं. नाविकांनी हवं तसं भाडं आकारलं का असं विचारल्यावर त्याने स्पष्टपणे नाही सांगितलं. पण आपली कमाई प्राणामिकपणे केलेली आहे, असं पिंटूनं सांगितलं. पिंटू म्हणाला सरकारने जे दर ठरवले होते, तितकंच भाडं घेण्यात आलं. काही नाविकांनी मनमानी भाडं आकारलं असेल पण आमच्या कुटुंबाने असं नाही केलं. काही भाविकांनी त्यांना दानदक्षिणाही दिली असं त्यांनी सांगितलं.
शहरी जीवनाला वैतागलं कपल, फ्लॅट विकला अन् खरेदी केलं अख्खं गाव, जनावरं पाळून आहेत समाधानी!
एका बोटीचं म्हणाला तर यासाठी जवळपास 50 हजार ते 70 हजार रुपये खर्च येतो. पण पिंटुच्या कुटुंबाने एका बोटीने दिवसभरात 50 हजारपेक्षा जास्त रुपये कमवले. म्हणजे एका महिन्यात एका बोटीने त्यांनी 23 लाख रुपये कमाई झाली. 130 बोटींचं म्हणाल तर हे एकूण 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत.