इथियोपियाच्या ओमो व्हॅलीमध्ये राहणारी बोडी जमात ज्याला मीन म्हणूनही ओळखलं जाते, ती तिच्या अनोख्या सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जूनमध्ये इथं काएल उत्सव आयोजित केला जातो, जो जमातीचा नवीन वर्षाचा उत्सव आहे. या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे पुरुषांमध्ये सर्वात जाड असण्याची स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, प्रत्येक कुटुंब त्यांच्या अविवाहित पुरुषाची निवड करते, जो पुढील सहा महिन्यांसाठी एक विशेष आहार आणि जीवनशैली पाळतो.
advertisement
Plane Facts : एक पायलट बाहेर, एअरहॉस्टेस आत, प्लेन ऑटो मोडमध्ये अन्...; विमानातील डर्टी सीक्रेट्स
या अनोख्या प्रक्रियेत पुरुषांना सहा महिने त्यांच्या झोपडीत राहावं लागतं. या काळात त्यांना कोणतीही शारीरिक हालचाल किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी नसते. या काळात ते गायीचे रक्त आणि दूध पितात, ज्यामुळे त्यांचं वजन वेगानं वाढतं. महिला आणि मुली त्यांच्यासाठी ताजं गाईचे रक्त आणि दूध आणतात. बोडी जमातीमध्ये गाय पवित्र मानली जाते, म्हणून रक्त काढण्यासाठी, गायीची नस भाल्याने किंवा कुऱ्हाडीने टोचली जाते आणि नंतर ती मातीने बंद केली जाते जेणेकरून गायीचा जीव वाचेल.
हा आहार घेणं सोपं नाही. उष्ण हवामानामुळे रक्त लवकर गोठतं आणि स्पर्धकांना सकाळी लवकर दोन लीटर रक्त आणि दुधाचं मिश्रण प्यावं लागतं. बरेच पुरुष हे प्रमाण पचवू शकत नाहीत आणि उलट्या करतात. तरीही या आव्हानावर मात करणारे लोक समारंभाच्या दिवशी त्यांच्या बॉडीचं प्रदर्शन करतात. समारंभाच्या दिवशी पुरुष त्यांच्या शरीरावर चिखल आणि राख लावतात आणि शहामृगाच्या पिसांनी बनवलेले दागिने घालतात. त्यानंतर ते एका पवित्र झाडाभोवती तासन्तास प्रदक्षिणा घालतात, जिथं जमातीतील इतर पुरुष आणि स्त्रिया त्यांना प्रोत्साहन देतात.
काय सांगता! झोपेतही लाखो रुपये कमवतेय ही महिला, कसे काय? दाखवली ट्रिक
या स्पर्धेचा विजेता सर्वात मोठं पोट असलेला पुरूष असतो. त्याला कोणतंही भौतिक बक्षीस मिळत नाही, परंतु तो आयुष्यभर जमातीचा हिरो बनतो. बोडी जमातीच्या महिलांना मोठं पोट असलेले पुरूष अत्यंत आकर्षक वाटतात आणि असं मानलं जातं की त्या या पुरूषांशी लग्न करण्यास उत्सुक असतात.
समारंभानंतर पुरुष सामान्य आहाराकडे परत जातात आणि काही आठवड्यांत वजन कमी करतात. परंतु त्यांची हिरो ही प्रतिमा आयुष्यभर टिकते. बोडी जमातीतील प्रत्येक मुलाचं मोठे होऊन या स्पर्धेत भाग घ्यावा आणि हिरो व्हावं, असं स्वप्न असतं.
