काय सांगता! झोपेतही लाखो रुपये कमवतेय ही महिला, कसे काय? दाखवली ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman earn money while sleeping : एक महिला फक्त झोपून लाखो कमाई करत आहे. ती एक कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे, त्या महिलेने आता तिच्या आयुष्याबद्दल सांगितले आहे. कमाईची ही पद्धत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी', अशी एक म्हण आहे. म्हणजे अनेकांना काहीही न करता सर्वकाही मिळावं अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात तर ते शक्य नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. पैसे कमवण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. मग पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीने दुप्पट करता येतात. पण कधी झोपेतही पैसे कमवता येतील असं स्वप्न तरी तुम्ही पाहिलं होतं का? पण एक महिला असं करते आहे. आता ते कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महिलेनेच स्वतःच ही ट्रिक सांगितली आहे.
डेबोरा पेक्सोटो असं या महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची असून ब्राझीलमध्ये राहते. जी तिच्या अनोख्या स्ट्रीमिंगमुळे चर्चेत आहे. तिने एकेकाळी फक्त मनोरंजनासाठी तयार केलेला कंटेंट आता करोडो रुपयांच्या कमाईचं साधन बनला आहे. डेबोराने त्याला तिचा 'नाईट टाइम रिअॅलिटी शो' असं नाव दिलं आहे,
डेबोराहचा दावा आहे की तिचे चाहते तिला झोपलेले पाहण्यासाठी पैसे देतात. ती म्हणते की लोक तिची झोप संपूर्ण रात्र थेट पाहण्यासाठी 84 पौंड म्हणजे सुमारे 9500 रुपये) खर्च करण्यास तयार आहेत. दररोज सुमारे 40 लोक तिची झोप थेट पाहतात.
advertisement
डेबोरा म्हणते, सुरुवातीला तिला हे सर्व विचित्र वाटलं. पण हळूहळू तिला जाणवलं की तिच्या प्रेक्षकांना त्यात एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि जवळीक जाणवते. तिच्या मते, अनेक पुरुष तिला असे संदेश पाठवायचे की त्यांना काहीही करण्याची गरज नाही, फक्त शांतपणे तिथे उपस्थित राहणं पुरेसं आहे. ही मागणी पाहून तिने ते व्यावसायिक उत्पादनात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
डेबोराहने तिची खोली अशा प्रकारे सजवली आहे की ती सुरक्षा कॅमेरा फुटेजसारखी दिसते. मंद दिवे असलेली खोली, स्थिर कॅमेरा अँगल, कोणतेही पार्श्वभूमी संगीत किंवा कट नसलेली खोली, संपूर्ण सेटअप असं आहे की जणू काही तिच्या बेडरूममध्ये थेट कॅमेरा बसवला आहे.
advertisement
जरी ही संकल्पना थोडी असामान्य वाटत असली तरी, डेबोराहने त्यांची गोपनीयता संरक्षित केली आहे याची देखील खात्री केली आहे. संपूर्ण स्ट्रीमिंग सिस्टम तिच्या नियंत्रणाखाली आहे आणि अशा प्रकारे डिझाइन केलेली आहे की त्यांची गोपनीयता धोक्यात येणार नाही.
डेबोराह म्हणते, 'यामागील कल्पना अशी आहे की प्रेक्षकांना असं वाटतं की तो माझ्या खोलीत उपस्थित आहे. काहीही घडत नाही आणि लोकांना तेच आवडतं. जिथं कोणतंही उत्तेजन नसतं, तिथं ते त्यांच्यासाठी एक उत्तेजन बनतं.
advertisement
डेबोरा म्हणते आतापर्यंत तिने 40 हून अधिक सबस्क्रिप्शन विकल्या आहेत आणि ही संख्या सतत वाढत आहे. मनोरंजक म्हणजे हे प्रेक्षक खूप निष्ठावंत आहेत. ती म्हणते की प्रत्येक व्यक्तीला कंटेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. काही लोकांना अॅक्शन, ड्रामा किंवा थ्रिल हवे असलं तरी, तिच्या प्रेक्षकांसाठी, शांतता आणि जवळीकतेची भावना हेच सर्वात मोठं आकर्षण आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 16, 2025 4:55 PM IST


