महिला मुलांना घेऊन पार्कमध्ये गेली. लहान मुले पार्कमध्ये मस्त झोका खेळत होती. मुलांना झोका खेळताना पाहून महिलेला आपला मोह आवरला नाही. तीदेखील लहान मुलांच्या झुल्यावर बसली आणि अडकली.
डिलिव्हरी द्यायला आलेल्या व्यक्तीला घरासमोर दिसला पूल, केलं असं काही....
ही घटना एसेक्सच्या साउथेंडची आहे. येथे राहणारी लेले वनबेस्ट नावाची महिला आपल्या मुलीसह पार्कमध्ये गेली होती. तिथे सगळे मिळून खूप एन्जॉय करत होते. लेलाने आपल्या मुलीला झुल्यावर डोलताना पाहिले तेव्हा तिलाही लहान मुलासारखे खेळावं वाटलं. मोहाच्या भरात ती लहान मुलांच्या झोक्यात बसली. 22 वर्षांची लेले मुलांच्या झुल्यावर बसली आणि खेळू लागली. सुमारे 10 मिनिटे झोके घेतल्यानंतर ती झोक्यात अडकली.
advertisement
PHOTOS: भुतांचं शहर, या ठिकाणी माणसांचा पत्ताच नाही, नेमकं कारण काय?
सुरुवातीला तिनं स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते शक्य झालं तेव्हा तिनं आपल्या मित्रांची आणि अगदी अनोळखी लोकांना मदत मागितली. सुमारे 1 तास सर्वांनी मिळून लीलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग न झाल्यानं अखेर आपत्कालीन क्रमांकावर कॉल करण्यात आला आणि अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले, ज्यांनी लीलाची मदत केली.
