तसं आता महिलांनी धूम्रपान करणं काही नवं नाही. पण तरी बऱ्या महिला घरातल्यांपासून लपूनछपून स्मोकिंग करतात. सासरी गेल्यावर तर कित्येकींना तेसुद्धा करायला मिळत नाही. पण व्हायरल होणाऱ्या कुटुंबाला पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
व्हिडिओमध्ये हे कुटुंब एकत्र सिगारेट ओढताना दिसत आहे. त्या महिलेने तिचे नाव कविता देवी असे सांगितलं. तिची सून तिच्या शेजारी उभी आहे. तिचा मुलगा आणि पती देखील एकत्र दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण कुटुंब हातात सिगारेट ओढताना दिसलं.
advertisement
VIDEO : नवरा तर नवरा सासूलाही सोडलं नाही, सुनेचं कृत्य पाहून अख्खं सासर थरथर कापू लागलं
सहसा सिगारेटमुळे घरात महाभारत सुरू होतं. परंतु या कुटुंबात सासू स्वतः तिच्या सुनेला सिगारेट ओढायला लावते. याचा अभिमान बाळगूनत्या महिलेने सांगितले की ती तिच्या सुनेला सिगारेट ओढायला लावते. जेव्हा तिला विचारण्यात आले की तुमची सून सिगारेट ओढते, तेव्हा ती म्हणाली की त्यात काय चूक आहे. ती तिच्या संपूर्ण कुटुंबासह सिगारेट ओढते. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
सुरुवातीला दूर राहणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची सुरुवात झाली. पण यानंतर काळ बदलला आणि लॉकडाऊन दरम्यान, मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर जास्त होऊ लागला. यानंतर, जेव्हा सोशल मीडियाद्वारे पैसे कमवण्याची संधी आली, तेव्हा लोकांनी अशी सामग्री तयार करण्यास सुरुवात केली जी अधिकाधिक लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकेल. पैसे कमवण्यासाठी लोक अशा गोष्टी करताना दिसतात की ज्या पाहून आपल्याला आश्चर्य वाटते आणि धक्काही बसतो.
सशासोबत रोमान्स, प्रेग्नंट झालं मांजर, जन्माला आलं असं पिल्लू की... VIDEO VIRAL
(सूचना : सिगारेटचं व्यसन वाईट आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो म्हणून दाखवण्यात आला आहे. न्यूज18मराठी धूम्रपानाला प्रोत्साहन देत नाही.)