सशासोबत रोमान्स, प्रेग्नंट झालं मांजर, जन्माला आलं असं पिल्लू की... VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
Animal video viral : सोशल मीडियावर एक अतिशय विचित्र व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यात मांजर आणि सशाच्या संबंधातून प्रेमातून जन्मलेल्या पिल्लाला दाखवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : निसर्गाने सर्व काही खूप विचारपूर्वक निर्माण केले आहे. प्रत्येक प्रजातीचा एक नर आणि एक मादी निर्माण करण्यात आली आहे. जेव्हा दोघांमध्ये संबंध निर्माण होतो तेव्हा एक नवीन प्राणी निर्माण होतो. तरी मानवांनी प्रयोगाचा भाग म्हणून अनेक संकरित जाती निर्माण केल्या आहेत. हे स्वतःच एक चमत्कार असल्याचं म्हटलं जातं. पण अलीकडेच सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामध्ये एका सशाने मांजरीला प्रेग्नंट केलं आणि तिला विचित्र पिल्लू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.
एका मुलीने तिच्या अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये मुलीने ही अनोखी प्रेमकहाणी शेअर केली. तिने सांगितलं की तिच्य घरात एका मांजरीला सशासोबत रोमान्स करताना पकडलं होतं. पण यामुळे मांजर गर्भवती झाली तेव्हा तिला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं. या विचित्र गर्भधारणेनंतर मांजर खूपच आक्रमक झाली. मांजरीने बाळांना जन्म दिल्यावर आश्चर्याची सीमा ओलांडली गेली. मुलाला पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं.
advertisement
मुलीने सांगितलं की, एके दिवशी ती अचानक घरी आली तेव्हा तिला दिसलं की तिची मांजर आणि ससा संबंध ठेवत आहेत. यानंतर मांजर खूप चिडचिड करू लागली. ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. जेव्हा मांजरीने दोन महिन्यांनी बाळांना जन्म दिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हे मूल मांजरीसारखे दिसत होतं पण त्याची चाल सशासारखी होती.
advertisement
advertisement
हा व्हिडीओ पाहून आणि स्टोरी ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले होते, जेव्हा अचानक सत्य बाहेर आलं. अनेकांनी कमेंट्समध्ये त्याची सत्यता उघड केली. व्हिडिओच्या सुरुवातीला दिसणारी मांजर नंतर दिसणाऱ्या मांजरीपेक्षा वेगळी होती. तसंच, हे जैविकदृष्ट्या शक्य नाही. ससा कधीही मांजरीला गर्भवती करू शकत नाही. दोघांचे गुणसूत्र वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत हे अशक्य आहे. याचा अर्थ असा की मुलीने ही खोटी कहाणी फक्त व्हायरल होण्यासाठी शेअर केली.
Location :
Delhi
First Published :
April 06, 2025 1:33 PM IST