अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियातील ही घटना. एमी नावाची ही महिला. तिची लहान मुलगी बाहेर खेळत होती. अचानक एमीची नजर तिच्यावर पडली आणि एमीला धक्काच बसला. कारण तिच्या मुलीच्या हातात चक्क एक जिवंत साप होता. दुसऱ्या हातावर बेडुक बसला होता. इतकंच नाही तर यानंतर एमीने मुलीचे खिसे तपासले. तेव्हा तर ती पुरती हादरली. कारण तिने खिशातही बेडुक आणि साप ठेवले होते.
advertisement
साप आणि मुंगूसाची लढाई, मधे पडला कावळा; पुढे काय घडलं? तुम्हीच VIDEO मध्ये पाहा
एमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट mama_and_johnnys_daily_play वर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एमीने विचारलं की, "तुझ्या खिशात किती प्राणी आहेत?"
जॉनी अभिमानाने तिचे दोन्ही हात पुढे करते, एका हातात बेडूक आणि दुसऱ्या हातातील साप दाखवते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की हा साप एक सामान्य गार्टर साप आहे जो माणसांसाठी धोकादायक नाही. एमी सुरुवातीला हसते नंतर काळजीपूर्वक तिच्या मुलीचे खिसे बघते आणि तिथे तिला जे आढळते ते सर्वांना आश्चर्यचकित करते. दुसरा साप तिच्या मोठ्या खिशात होता, तर दोन्ही बाजूंच्या खिशातही लहान साप होते. एकूण जॉनीने तिच्या खिशात तीन साप आणि एक बेडूक पाळीव प्राणी म्हणून ठेवले होते.
सापांनी भरलेल्या विहिरीतील ते 54 तास! महिलेने असा वाचवला स्वतःचा जीव, सगळे शॉक
व्हिडिओमध्ये एमी हसत तिच्या मुलीला विचारते, "मी साप धरू शकते का?" जॉनी लगेच उत्तर देते "हो, मम्मी, हे घे" आणि खिशातून साप काढत तिच्या आईला देते. हसत एमी सापाला धरते आणि म्हणते, "नक्कीच, मला आवडेल."