टिन माँग हटवे असं या व्यक्तीचं नाव. ते एक शिक्षक आहे. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक. म्यानमारमध्ये भूकंप झाले तेव्हा ते भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या सागिंगमध्ये होते. एका हॉटेलच्या इमारतीत. भूकंपामुळे इमारत कोसळली आणि बरेच लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गेले. इथं बचाव करणाऱ्यांनी कुणीही जिवंत सापडेल याची आशाच सोडली होती. तेव्हाच या इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेले टिन माँग ह्टवे जिवंत सापडले.
advertisement
भारतात लग्न, इंडोनेशियात हनीमूननंतर नवरीचं धरणे आंदोलन, 50 तासांनी संपलं, काय झाला शेवट?
भूकंपावेळी त्यांना दोन गोष्टींनी मदत केली, एक म्हणजे शालेय शिक्षण आणि दुसरं म्हणजे स्वतःची लघवी.
भूकंपावेळी टिन माँग ह्टवे यांना शाळेतील धडा आठवला ज्यामध्ये भूकंप झाल्यास बेड किंवा टेबलाखाली जावं, असं सांगितलं होतं. भूकंप झाला तसं ते लगेच बेडखाली गेले. त्यानंतर संपूर्ण हॉटेल कोसळलं आणि त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला.
5 दिवस ते बेडखाली जिवंत राहण्यासाठी धडपड करत होते. त्यांनी सांगितलं, मी फक्त 'मला वाचवा, मला वाचवा' असं ओरडत होतो. मी जणू नरकात आहे असं वाटत होतं. माझ्या शरीराचं तापमान वाढलं होतं. मला पाण्याची गरज होती, पण तिथं पाणी नव्हते. त्यामुळे मला माझा घाम आणि लघवी प्यावी लागली.
अद्भुत! बांधलं नाही तर प्रिंट केलंय हे घर, भारतातील पहिला 3D प्रिंटेड विला पुण्यात, पाहा PHOTO
म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी 28 मार्च 2025 रोजी 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला.भूकंपातील मृतांचा आकडा तीन हजारांच्या जवळ पोहोचला आहे, तर 4 हजार लोक जखमी झालेत. शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे.