advertisement

भारतात लग्न, इंडोनेशियात हनीमूननंतर नवरीचं धरणे आंदोलन, 50 तासांनी संपलं, काय झाला शेवट?

Last Updated:

Bride protest : शालिनी 5 मार्चपर्यंत सासरी होती, पण 6 मार्चला होळीच्या निमित्ताने ती माहेरी निघून गेली. 30 मार्च रोजी परत आल्यानंतर मात्र तिने थेट पतीच्या घरासमोरच आंदोलन सुरू केलं.

News18
News18
नवी दिल्ली : लग्नानंतर नवरी आपल्या सासरच्या घरी गृहप्रवेश करते पण एक नवरी मात्र चक्क धरणं आंदोलनाला बसली होती. सासरच्या घराबाहेरच तिनं धरणं आंदोलन सुरू केलं होतं. तब्बल 50 तासांनी अखेर तिचं आंदोलन मिटलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील हे प्रकरण आहे. या नवरीने आंदोलन का केलं होतं आणि शेवटी आंदोलन कसं मिटलं ते पाहुयात.
शालिनी आणि प्रणव यांचा विवाह 2 फेब्रुवारी 2025 रोजी  झाला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारीला दोघंही हनीमूनसाठी इंडोनेशियाला गेले. मात्र, काही मतभेद झाल्यामुळे ते दहा दिवसांतच परतले. शालिनी 5 मार्चपर्यंत सासरी होती, पण 6 मार्चला होळीच्या निमित्ताने ती माहेरी निघून गेली. 30 मार्च रोजी परत आल्यानंतर मात्र तिने थेट पतीच्या घरासमोरच आंदोलन सुरू केलं.
advertisement
आंदोलनाचं कारण काय?
लग्नानंतर सासरी जाताना नववधूच्या मनात अनेक स्वप्ने असतात. मात्र, जर नवऱ्यानेच तिच्या प्रवेशासाठी नकार दिला तर, त्या दुःखाची कल्पनाही करवत नाही. नवरा आणि सासरच्या मंडळींनी नववधूला घरात प्रवेश करण्यासाठी मनाई केली आणि सगळा राडा झाला.
advertisement
सासरच्यांनी शालिनीला घरात घेतलं नाही. तिने आपल्या सासरच्यांवर 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.  मात्र, पती प्रणव सिंघलने हे आरोप फेटाळले असून उलट शालिनीवरच त्याने गंभीर आरोप केले आहेत. प्रणव सिंघलने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात सांगितले की, शालिनीकडून आपल्याला धोका आहे. मेरठमधील प्रसिद्ध ब्लू ड्रम हत्याकांडामुळे तो आणि त्याचा परिवार घाबरलेला आहे.
advertisement
कसं मिटलं आंदोलन?
पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबातील हा वाद मिटवण्यासाठी राजकीय नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मध्यस्थीनंतर शालिनीला सासरच्यांनी घरात घेतलं. तिनं आपलं आंदोलन मागे घेतलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
भारतात लग्न, इंडोनेशियात हनीमूननंतर नवरीचं धरणे आंदोलन, 50 तासांनी संपलं, काय झाला शेवट?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement