लंगडत चालणाऱ्या या विद्यार्थिनींच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सर्व मुलींची अवस्था सारखीच आहे. त्यांना पायातून लकवा मारला आहे. सर्वजण तशाच चालत आहेत. कुणी एकमेकींना धरून तर कुणी भिंतीचा आधार घेत चालत आहे. माहितीनुसार पूर् आफ्रिकेच्या केनियातील सेंट थेरेसा एर्गी हायस्कूलमधील हे दृश्य असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
तुम्हीही चिप्स आवडीने खाता, मुलांनाही देता; मग हा VIDEO एकदा पाहाच, नाहीतर पस्तावाल
सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या मुलींच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे अपंग झाला आहे. स्थानिक मीडिया आउटलेट्सने दिलेल्या माहितीनुसार. मुलींचे पाय अचानक सुन्न झाले आणि स्थिर झाले. गेल्या काही आठवड्यांपासून या मुली रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची अवस्था पाहून त्यांचं कुटुंब आणि इतर सर्व लोकही घाबरले आहेत.
काकामेगा काउंटी हेल्थ सीईसी बर्नार्ड वेसोंगा यांनी पत्रकारांना सांगितलं की, या अज्ञात आजाराचं कारण समजून घेण्यासाठी मुलींचे रक्त, मूत्र आणि स्टूलचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे, असं वृत्त आज तकने दिलं आहे.
VIDEO : 'प्लीज देवा मला वाचव' लिफ्टमध्ये 20 मिनिट अडकून राहिली चिमुकली
@PrinceCarlton या X अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
या मुलींना काय झालं असावं, असं तुम्हाला वाटतं? याबाबत तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
