VIDEO : 'प्लीज देवा मला वाचव' लिफ्टमध्ये 20 मिनिट अडकून राहिली चिमुकली
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अचानक काही तांत्रिक बिघाड झाला तर अनेक लोक लिफ्टमध्ये अडकून पडतात किंवा काही अपघातही घडतात. त्यामुळे लिफ्ट जेवढी सोयीची तेवढीच घातकही आहे.
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : प्रत्येक उंच बिल्डिंगमध्ये लिफ्ट असतात. जेणेकरुन लोकांना पायऱ्या चढण्या उतरण्याचा त्रास होऊ नये. मात्र अनेकदा या सोयीसाठी लावलेल्या लिफ्ट त्रासदायक ठरतात. अचानक काही तांत्रिक बिघाड झाला तर अनेक लोक लिफ्टमध्ये अडकून पडतात किंवा काही अपघातही घडतात. त्यामुळे लिफ्ट जेवढी सोयीची तेवढीच घातकही आहे. एका ठिकाणी लिफ्टमध्ये चिमुकली 20 मिनिट अडकल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
एक मुलगी 20 मिनिट लिफ्टमध्ये अडकून होती. या वेळात ती खूप भयभीत झाली, बाहेर निघण्याचा खूप प्रयत्नही करत होती मात्र तिला बराच वेळ अडकून रहावं लागलं. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून समोर आला आहे.
लखनऊच्या गुडंबा पोलीस स्टेशनच्या जनेश्वर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. येथे एक 8 वर्षांची शाळकरी मुलगी लिफ्टमध्ये अडकली होती. ती शाळेतून घरी जात असताना हा प्रकार घडला. लिफ्ट अचानक बंद पडली पडली. तिनं घाबरुन लिफ्टमध्ये आरडाओरडा सुरु केला, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र लिफ्ट काही उघडली नाही. तिनं देवालाही विनवणी केली की, 'प्लीज देवा मला वाचव' मुलगी 20 मिनिट लिफ्टमध्ये अडकून होती. लिफ्टमधील कॅमेऱ्यामध्ये हे सर्व कैद झालं.
advertisement
A 5-year-old innocent girl was stuck in the lift for 20 minutes in a residential apartment in #Lucknow and cried for help. Always accompany your kids while riding an elevator. #UttarPradesh #ViralVideo pic.twitter.com/OR3cOalhUf
— LMS ✏️ (@Lalmohmmad) October 4, 2023
advertisement
दरम्यान, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की, 5 मिनिट लाईटने ये जा केलं. त्यामुळे लिफ्ट बिघडली आणि मुलगी त्यात अडकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2023 1:55 PM IST


