ASKAP J1832-0911 नावाच्या एका रहस्यमय वस्तूने खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केलं आहे. ही वस्तू दर 44 मिनिटांनी रेडिओ लहरी आणि एक्स-रे सिग्नल पाठवते. त्याचे प्रत्येक सिग्नल पूर्ण दोन मिनिटांपर्यंत पोहोचते. ते इतकं अनोखं आहे की शास्त्रज्ञ म्हणत आहेत, 'मी यापूर्वी कधीही असं काही पाहिलं नव्हते.'
पृथ्वीच्या आत धकधक! दर 26 सेकंदांनी होतेय हृदयासारखी धडधड, आवाजाचं रहस्य काय?
advertisement
ही वस्तू ASKAP रेडिओ दुर्बिणी आणि नासाच्या चंद्रा एक्स-रे वेधशाळेच्या मदतीने टिपण्यात आली. योगायोगाने जेव्हा ऑस्ट्रेलियाची रेडिओ दुर्बिणी या भागाचे स्कॅनिंग करत होती, तेव्हा चंद्रा एक्स-रे वेधशाळा देखील त्याच वेळी त्याच भागावर लक्ष ठेवून होती. ही अनोखी वस्तू 2022 मध्ये पहिल्यांदा शोधण्यात आलेल्या लॉन्ग-पीरियड ट्रान्झिएंट्स (LPTs) नावाच्या एका नवीन प्रकारच्या खगोलीय घटनांशी संबंधित आहे. परंतु एलपीटीमधून एक्स-रे बाहेर पडताना दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठाचे डॉ. अँडी वांग यांच्या मते, 'हा शोध गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखा आहे.'
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही वस्तू चुंबकीय असू शकते, म्हणजेच ती कदाचित एखाद्या मृत ताऱ्याचा गाभा असू शकते, ज्यामध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती आहे किंवा ती बायनरी स्टार सिस्टमदेखील असू शकते, ज्यामध्ये एक तारा अत्यंत चुंबकीय पांढरा बटू आहे. परंतु हे सिद्धांत देखील हे रहस्य पूर्णपणे सोडवू शकत नाहीत.
अहवालांनुसार, स्पेनच्या अंतराळ विज्ञान संस्थेच्या प्राध्यापक नंदा रेया म्हणतात, 'या एका शोधावरून असं सूचित होतं की विश्वात अशा अनेक वस्तू लपलेल्या असू शकतात. तसंच रेडिओ आणि एक्स-रे माध्यमांमध्ये एकाच वेळी असे सिग्नल कॅप्चर केल्याने भविष्यातील शोधांसाठी एक नवीन मार्ग उघडतो.