जर्मनीतल्या 2 गिर्यारोहकांनी त्या माणसाचे फोटो मिळवले आहेत. जीना वेस आणि तिचा सहकारी टोबी यांनी राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी (22 ऑगस्ट) मोबाइलवर हे फोटो टिपले आहेत. त्यात एका खडकावर बसलेला नग्न माणूस दिसत आहे. त्याच्या डाव्या हातात काठी तर दुसऱ्या हातात टोकदार काही तरी आहे.
“वाळूच्या दगडाच्या गुहेत आम्ही पोहोचलो तेव्हा हा वुल्फ मॅन आम्हाला दिसला. तो एका गुहेच्या वर होता. त्यानं आमच्यावरून एकदाही नजर हटवली नाही. तसंच तो अवाक्षरही बोलला नाही. इतिहासाच्या पुस्तकातल्या आदिमानवाप्रमाणे तो दिसत होता,” असं वेस यांनी ‘बिल्ड’ या जर्मन टॅब्लॉइडला सांगितलं.
advertisement
बिल्डच्या माहितीनुसार, 2015पासून या व्यक्तीचं तुरळक वेळा दर्शन घडलं आहे. काही वेळेला जंगलात आग लागल्याच्या किंवा काही घरासारखं बांधल्याच्या घटना घडल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे. असं असलं तरी स्थानिक अग्निशमन सेवेतल्या एका स्वयंसेवकानं ‘द टेलिग्राफ’ला सांगितलं, की त्यांना जंगलात काही असामान्य आढळलं नाही. हा खोडसाळपणा असू शकतो असं त्यांचं मत होतं.
वाचा - चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीरांनी जे पाहिलं ते ऐकून सगळेच हादरले!
जर्मनीच्या भूभागाचा एक तृतीयांश भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे, हे लक्षात घेता स्थानिक माध्यमांमध्ये अधूनमधून या भागात एकट्याने राहणाऱ्या व्यक्तींची माहिती समोर येते. 2007मध्ये, एक अमेरिकन नागरिक पश्चिम जर्मनीतल्या आयफेल या एका लहान डोंगराच्या मध्यभागी झोपडीमध्ये राहत असल्याचं आढळलं. तिथं त्यानं गांजाचा छोटासा मळा फुलवला होता. या जंगलाशी अनेक दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. या दंतकथांनी जर्मन ब्रदर्स ग्रिमच्या असंख्य परिकथांना प्रेरणा दिली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात, बर्लिनच्या बाहेरच्या जंगलात सिंह फिरत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. हे प्राणी रानडुक्कर असल्याचं उघड होईपर्यंत बरेच दिवस चर्चा रंगली होती. क्लेनमॅच्नोच्या उपनगरातल्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सिंहीण असल्याचे काही व्हिडिओ त्यांच्याकडे पुरावे म्हणून असल्याचं सांगितलं व रहिवाशांना घरातच राहण्याची सूचना दिली. हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे पुष्कळ शोध घेतल्यानंतर, स्थानिक अधिकाऱ्यांना त्यात काही तथ्य आढळलं नाही. त्यामुळे ‘वुल्फ मॅन’चं वृत्तदेखील खरं आहे का याचा लवकरच उलगडा होईल.