Neil Armstrong death anniversary :चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीरांनी जे पाहिलं ते ऐकून सगळेच हादरले!

Last Updated:

नासाच्या अपोलो 11 या अंतराळयानातून मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. प्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी 1969 मध्ये अपोलोच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवलं होतं.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई, 25 ऑगस्ट : भारताच्या चांद्रयान-3 या मोहिमेच्या यशामुळे सध्या सर्वत्र चंद्र आणि तेथील संभाव्य संसाधनांची चर्चा आहे. वास्तविक पाहता माणसाची चंद्रावर जाण्याची किंवा तिथे यान पाठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी, 20 जुलै 1969 रोजी नासाच्या अपोलो 11 या अंतराळयानातून मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. प्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी 1969 मध्ये अपोलोच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्यांनी दावा केला होता की, या मोहिमेदरम्यान एका यूएफओनं (Unidentified Flying Object) म्हणजेच उडत्या तबकडीनं त्यांचा पाठलाग केला होता. विशेष म्हणजे, फक्त त्यांनीच नाही तर नंतरच्या काळात अंतराळात जाणाऱ्या अनेक अंतराळवीरांनी हीच तक्रार केलेली आहे.
नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन या दोघांनीही एलियन म्हणजे परग्रहवासी दिसले की नाही याचा उल्लेख केला नाही. पण, ते मोहिमेवर असताना अज्ञात वस्तू आसपासच्या परिसरात तरंगत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर अंतराळात गेलेल्या इतर अंतराळवीरांनी देखील ही बाब अनुभवलेली आहे. अंतराळवीरांचा समूह सतत सांगत आला आहे की, अंतराळात त्यांना काहीतरी अमानवी आणि अवर्णनीय आढळलं आहे. 2020 पर्यंत अनेक जणांनी यूएफओ आणि अगदी 'अंतराळ पाहुणे' असलेले एलियन्सदेखील पाहिल्याचा दावा केला आहे.
advertisement
अगदी अलीकडे कॉस्मोनॉट इव्हान व्हॅग्नर आणि एक विचित्र स्पेस गेस्ट यांच्यातील संवाद समोर आला होता. जो त्यानं घेतलेल्या अरोरा ऑस्ट्रेलिसच्या टाइम-लॅप्स व्हिडिओमध्ये सापडला. रशियन कॉस्मोनॉटनं नॉर्दर्न लाइट्सचं काही फुटेज घेतल्यानंतर यूएफओ बघितलेल्या दाव्यांची लाट उसळल्याचं दिसलं. कारण या रहस्यमयी व्हिडिओमध्ये लाइट्सच्या बाजूनं उडणाऱ्या वस्तूंची रांग कॅप्चर केली गेली होती.
advertisement
सीटीव्हीनं दिलेल्या वृत्ताप्रमाणे, 2020 मध्ये फुटेज पाहणाऱ्यांना व्हॅग्नरने सांगितलं की, त्याच्या व्हिडिओमध्ये केवळ अरोरा लाइट्सच नाहीत तर आणखी काहीतरी दिसत आहे. आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन या अंतराळवीर जोडीच्या दाव्यानंतर जवळपास 50 वर्षांनंतर आकाशात काहीतरी विचित्र असल्याचा दावा पुन्हा करण्यात आला आहे.
आलेला अनुभव 2006 मध्ये आठवून ऑल्ड्रिन म्हणाला, "आता, साहजिकच आहे की तिथे काय चाललं होतं हे आम्ही ओरडून सांगणार नव्हतो. 'हेय ह्यूस्टन आमच्या आजूबाजूला काहीतरी चाललं आहे आणि ते काय आहे याची आम्हाला कल्पना नाही, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सांगू शकता का ते काय आहे? आम्ही असं करणार नव्हतो. कारण, आम्हाला माहीत होतं की ते प्रसारण सर्व प्रकारच्या लोकांकडून ऐकले जाईल. एलियन्समुळे किंवा इतर कोणत्या कारणानं आम्ही मागे फिरावं, अशी मागणी केली असती. म्हणून आम्ही याचा जाहीर उल्लेख केला नाही. आम्ही ठरवलं की आम्ही सावधपणे ह्यूस्टनला विचारू की S-IVB कुठे आणि किती दूर आहे?"
advertisement
या गोष्टीला बराच काळ लोटला आहे. अपोलो 11 मोहिमेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं कबूल केलं आहे की, ती वस्तू स्पष्टपणे एक उडणारी तबकडी होती. डॉ. डेव्हिड बेकर यांनी दुजोरा दिला की, त्यांच्या चंद्राच्या प्रवासादरम्यान क्रूला काहीतरी अनपेक्षित दिसलं होतं. ते म्हणाले, "ती स्पष्टपणे एक अज्ञात उडणारी वस्तू होती. पण, अशा वस्तू असामान्य नव्हत्या आणि मागील काही वर्षांचा अंतराळ उड्डाणांचा इतिहास असं दर्शवितो की अनेक क्रूनं अशा वस्तू पाहिल्या आहेत". आर्मस्ट्राँगला दिसलेली वस्तू कदाचित त्यांच्या स्वत:च्या अंतराळयानातून बाहेर फेकलेल्या अवशेषांचं संकलन असू शकतं.
मराठी बातम्या/Viral/
Neil Armstrong death anniversary :चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीरांनी जे पाहिलं ते ऐकून सगळेच हादरले!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement